chhattisgarh news: छत्तीसगढच्या जशपूर जिल्ह्यात सर्पदंशच्या अनेक घटना घडतात. मात्र यावेळी एक चक्रावून टाकणारी घटना घडली आहे. साप माणसांना दंश करत असल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील. मात्र आता माणूस विषारी सापांना चावत आहे. जशपूर जिल्ह्यात एका मुलाला साप चावला. त्यामुळे मुलगा संतापला.

पंडरापाठमध्ये वास्तव्यास असलेला मुलगा घरापासून दूरवर राहत असलेल्या ताईकडे गेला होता. दीपक राम असं मुलाचं नाव आहे. दीपक खेळत असताना एक साप त्याच्या हाताला चावला. त्यामुळे दीपक संतापला. रागाच्या भरात त्यानं सापाला पकडलं आणि त्याचा चावा घेतला. या दरम्यान दीपकच्या हाताला सापानं विळखा घातला होता. दीपकच्या ताईला याबद्दल समजताच तिनं दीपकला घेऊन रुग्णालय गाठलं. दीपकची प्रकृती आता स्थिर आहे.
खेळत असताना सापानं दंश केल्याचं दीपकनं सांगितलं. सापानं दंश केल्यानं राग आल्यानं मीदेखील त्याला चावलो. याची माहिती कुटुंबियांना दिली, असं दीपक म्हणाला. घरात पाणी आणण्यासाठी गेलेली असताना दीपक माझ्याजवळ आला. त्यानं साप चावल्याचं सांगितलं. रागाच्या भरात मीदेखील त्याला चावल्याचं दीपक म्हणाला. मग आम्ही तातडीनं रुग्णालय गाठलं. त्याची प्रकृती चांगली असल्याचं दीपकच्या ताईनं सांगितलं.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.