नवी मुंबई: दिवाळीत कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी गुजरातमधील रस्ते कंत्राटदाराला कोऱ्या करकरीत नोटा हव्या होत्या. त्यासाठी त्यानं एका व्यक्तीशी संपर्क साधला. मात्र एका रॅकेटनं त्याची ३.५ कोटी रुपयांची फसवणूक केली. यामध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचा आरोप कंत्राटदारानं केला.

नवी मुंबई पोलिसांनी सेटलमेंटसाठी कॉल केल्याचा आरोप कंत्राटदारानं केला. या प्रकरणी आयुक्तांकडे धाव घेतल्यानंतर गुन्हा दाखल झाला. प्रकरणाचा तपास सुरू असून यात पोलिसांचा सहभाग आढळून न आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. या प्रकरणात आतापर्यंत एकाला अटक केली आहे.

अजय मिश्रा नावाचा व्यक्ती आपल्याला नेहमी नव्या नोटा द्यायचा असं कंत्राटदार असलेल्या बाबू जयेश सिंह यांनी सांगितलं. ऑगस्टमध्ये सिंह यांनी नव्या नोटांसाठी मिश्राशी संपर्क साधला. मिश्रानं ठाकूरशी ओळख विशाल विरोजाशी करून दिली. विशालचा मित्र आरबीआयच्या कोषागारात काम करत असल्याची बतावणी मिश्रानं केली. मलाही दीड कोटी रुपयांच्या करकरीत नोटा हव्या आहेत. त्यामुळे आपण नोटा घेण्यासाठी नवी मुंबईला सोबतच जाऊ, असं विरोजानं ठाकूर यांना सांगितलं.
तुम्हाला कितीदा सांगितलंय सोबत राहायचं नाही! सावत्र मुलांवर बाप संतापला; नको ते करून बसला
ठाकूर आणि विरोजा २६ सप्टेंबरला बेलापूरला पोहोचले. तिथे त्यांना मोईन काद्री भेटला. तिघांना सुशील कुलकर्णी भेटला. आपण आरबीआयचे कर्मचारी असल्याचं कुलकर्णीनं सांगितलं. तो त्यांना बेलापूरमधील आरबीआयच्या कार्यालयाजवळ घेऊन गेला. तुम्ही बाहेर थांबा. मी नव्या नोटांनी भरलेली व्हॅन पाठवतो, असं सांगून कुलकर्णी तिथून निघून गेला. थोड्या वेळानं व्हॅन आली. ठाकूरनं नोटा दाखवण्यास सांगितलं. मात्र तसं केल्यास समस्या निर्माण होईल असं कुलकर्णी म्हणाला.

काद्री व्हॅनमध्ये बसला. ठाकूर आणि विरोजा यांची कार व्हॅनच्या मागून धावत होती. दोन्ही वाहनं गुजरातच्या दिशेनं निघाली. तळोजा येथे एका इनोव्हानं त्यांना ओव्हरटेक केला. इनोव्हामधील अज्ञातांनी व्हॅनच्या चालकाला धमकावलं आणि व्हॅन घेऊन पळून गेले. ठाकूर आणि विशाल झाला प्रकार पाहून घाबरले. त्यानंतर काद्री त्यांना बीकेसीतील हॉटेलमध्ये भेटला. व्हॅन आणि कार आरबीआयच्या दक्षता पथकानं जप्त केल्याचं त्यानं सांगितलं. कुलकर्णी हे प्रकरण सोडवेल अशी खात्री त्यानं दिली. मात्र त्यानंतर त्यानं संपर्क तोडला.
निकितापासून लांब राहा! इन्स्टा स्टोरीवरून वाद, एक्सची तरुणाला जबर मारहाण, कानाचा पडदा फाटला
आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच ठाकूर सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी तक्रार नोंदवली. हे प्रकरण मिटवण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी कॉल केल्याचा, काही पोलीस निरीक्षकांनी संपर्क साधल्याचा दावा त्यांनी केला. दोन निरीक्षक पाठपुरावा थांबवा म्हणून माझ्या मागेच लागले. त्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतल्याचं ठाकूर यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here