इस्लामाबाद : एका ५२ वर्षीय शिक्षकाने २० वर्षीय विद्यार्थनीशी प्रेमविवाह केला आहे. दोघांच्या वयात मोठा फरक असल्याने सोशल मीडियावर या दोघांची कहाणी चर्चेत आहे. मला शिक्षकाचा लूक आणि व्यक्तिमत्व खूप आवडले होते असे मुलीने सांगितले. दोघांच्या वयात ३२ वर्षांचा फरक आहे. या कारणामुळे नातेवाईकांनीही या लग्नाबाबत नाराजी व्यक्त केली होती. पण तरीही दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचा ठामपणे निश्चय केला होता. (a 20 year old student falls in love with a 52 year-old teacher and gets married)

ही कथा एका पाकिस्तानी जोडप्याची आहे. झोया नूर असे या २० वर्षीय तरुणीचे नाव आहे. ही झोया ५२ वर्षीय साजिद अलीच्या प्रेमात पडली. झोया कॉलेजमधून बीकॉम करत होती. साजिद हे त्याच कॉलेजमध्ये शिक्षक आहेत. झोयाला साजिद यांचा लूक आणि व्यक्तिमत्व इतके प्रभावी वाटले की ती साजिद यांच्या प्रेमातच पडली.

एका मुलाखतीत झोयाने आपल्या प्रेमकहाणीचे वर्णन केले आहे. झोया म्हणाली, ‘सुरुवातीला साजिदने माझ्याकडे खूप दुर्लक्ष केले. पण एके दिवशी मी साजिदकडे प्रेम व्यक्त केले. मी त्याला सांगितले की तुम्ही मला खूप आवडता आणि मला तुमच्याशी लग्न करायचे आहे.

ब्रिटेनचे महाराजा चार्ल्सने महाराणी एलिजाबेथचे १४ घोडे विकले अन् तब्बल साडे नऊ कोटी कमावले
मात्र झोया आणि आपल्या वयात मोठा फरक आहे याबाबत साजिद विचार करू लागले. झोयाच्या प्रपोजलवर साजिद यांनी वयातील मोठ्या फरकावर विचार करण्यासाठी एका आठवड्याचा वेळ मागितला. या एका आठवड्यात साजिदही झोयाच्या प्रेमात पडू लागले. त्यानंतर दोघांनी लग्न केले.

या लग्नाबाबत साजिद यांचे नातेवाईकही नाराज होते. याबाबत माहिती देताना साजिद म्हणाले की, ‘ या निर्णयामुळे माझे अनेक नातेवाईक माझ्यावर संतापले. ते म्हणायचे की तू खूप देखणा आहेस, ही मुलगी तुला साजेशी नाही. झोया हिला देखील तिच्या नातेवाईकांचा विरोध होता. मात्र पण जर तुम्ही प्रेम केले असेल तर लग्न करावेच लागेल, अशी भूमिका झोयाने घेतली.

बापरे! जमिनी खाली लागला अतिप्राचीन शहराचा शोध; घरे, मंदिरे अन् बरंच काही सापडलं
साजिदच्या गुणवत्तेचे वर्णन करताना जोआ म्हणाली, ‘ते या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षक आहेत, मला हाच त्यांचा गुण जास्त आवडला. त्यांची समजावण्याची पद्धत खूपच छान आहे. मी त्यांची चाहती आहे. दुसरीकडे, साजिदने झोयाच्या या चांगल्या सवयींबाबतही सांगितले. ती घरून उत्तम आणि चविष्ट जेवण आणते . तसेच ती ऑफिसमध्ये चहा खूप छान बनवते, असे साजिद यांनी सांगितले.

या बाबतच्या पोस्टवर लोकांनी दोघांना त्यांच्या लग्नासाठी शुभेच्छा दिल्या. एका व्यक्तीने लिहिले, ‘अप्रतिम! शिक्षक आणि विद्यार्थ्याचे लग्न कौतुकास्पद आहे.’ तर आणखी एकाने लिहिले, ‘गुरू आणि शिष्य यांचे नाते खूप पवित्र असते. तिसऱ्या एकाने लिहिले, ‘अभिनंदन, अल्लाह तुम्हा दोघांनाही सुखी ठेवो.’

जगातील सर्वात मोठ्या मुस्लिम देशाच्या चलनी नोटेवर गणपती बाप्पाचा फोटो का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here