राजस्थान : राजस्थानमध्ये भगवान शंकराच्या भव्य मूर्तीचा लोकार्पण सोहळा पार पडत आहे, ‘विश्वास स्वरुपम’ असे या मूर्तीचे नामकरण करण्यात आले आहे. राजस्थानातील नाथद्वारा येथे या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे. या मूर्तीची उंची तब्बल ३६९ फूट असून जगातील सर्वात उंच शंकराची मूर्ती म्हणून मान्यता मिळालेली आहे.

लोकार्पण सोहळ्यात मुख्य आकर्षण काय ?

शिवमूर्तीचं लोकार्पण झाल्यानंतर २९ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरपर्यंत सलग ९ दिवस इथे धार्मिक, अध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. यादरम्यान मुरारी बापू राम कथा पाठचं ही आयोजन केलं आहे. या उंच प्रतिमेचं निर्माण करणाऱ्या तत पदम संस्थानचे ट्रस्टी आणि मिराज समूहाचे अध्यक्ष मदन पालीवाल यांनी ही माहिती दिली आहे.

गुजरात सरकारची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी खेळी, समान नागरी कायद्याबाबत मोठा निर्णय
राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील गणेश टेकडीवर ही भव्य मूर्ती आहे. या मूर्तीत भगवान शंकर ध्यान मुद्रेमध्ये बसलेले दिसत आहेत. ही मूर्ती तयार करण्यासाठी तब्बल १० वर्षे लागली आहेत. २०१२ साली ही मूर्ती उभारण्याची योजना आखण्यात आली होती. त्यानंतर आता २०२२ मध्ये ही मूर्ती पूर्ण तयार झाली आहे.

या मूर्तीचे बांधकाम कसे झाले ?

या भव्य मूर्तीजवळ लिफ्ट, जिने तसेच हॉलसुद्धा बांधण्यात आला आहे. ही मूर्ती पूर्ण होण्यासाठी ३००० टन स्टील आणि लोखंड तसेच २.५ लाख टन काँक्रीट आणि वाळू वापरण्यात आली आहे. ऑगस्ट २०१२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि मुरारी बापू यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. त्यानंतर आता या दोघांच्याच हस्ते या मूर्तीचं लोकार्पण करण्यात येणार आहे. नाथद्वारामधील ‘विश्वास स्वरुपम’ मूर्तीचं हे ठिकाण उदयपूर शहरापासून ४५ किलोमीटर अंतरावर आहे.

मूर्तीचे वैशिष्ट्य काय ?

संत कृपा सनातन संस्थानद्वारे या भगवान शंकराची ही मूर्ती तयार करण्यात आली आहे. या भव्य शिवमूर्तीचं बांधकाम ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन कंपनीने मिळून केलं आहे. या मूर्तीमध्ये चार लिफ्ट आहेत. या लिफ्टच्या साहाय्याने तुम्ही २७० फुट उंचीवर शंकराच्या डाव्या खांद्यावरील त्रिशूळवरुन पाहता येईल. ३६९ फुट उंच या मूर्तीमध्ये एका वेळी सुमारे १० हजार लोक राहू शकतात.

महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांची सुरक्षा काढली, पण नार्वेकरांची सुरक्षा का वाढवली?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here