मुंबई: मित्राच्या पत्नीवर बलात्कार करून वसई पोलीस दलातील हवालदार फरार झाला आहे. या प्रकरणी १८ ऑक्टोबरला नालासोपारा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. राहुल लोंढे असं आरोपी हवालदाराचं नाव आहे. लोंढे आणि त्याची प्रेयसी प्रिया उपाध्याय फरार आहेत. गेल्या महिन्यात पीडितेवर बलात्कार झाला. त्यात लोंढे आणि उपाध्याय यांचा सहभाग होता. दोन्ही आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

तक्रारदार महिला आणि तिच्या पतीची लोंढे आणि उपाध्याय यांच्याशी मैत्री होती. ते एकमेकांच्या घरी जायचे. लोंढे आणि उपाध्याय यांच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. २३ आणि २४ सप्टेंबरला आपल्यासोबत दुष्कृत्य घडल्याचं पीडितेनं तक्रारीत म्हटलं आहे. पीडित महिला मुंबईतील एका खासगी कंपनीत काम करते.
दिवाळी बोनससाठी करकरीत नोटांची गरज; RBIजवळून व्हॅन काढली; कंत्राटदारासोबत कोट्यवधींचा स्कॅम
पतीच्या दारु पिण्याच्या सवयीमुळे वाद झाला असून तो सोडवायला तुम्ही घरी या, असं पीडित महिलेनं लोंढे आणि उपाध्याय यांना सांगितलं. त्यावर तुम्हीच आमच्या घरी या असं लोंढे आणि उपाध्याय म्हणाले. पीडिता घरी पोहोचल्यावर दोघांनी तिला दारु ऑफर केली. काही तासांनंतर लोंढे आणि उपाध्याय यांनी आपल्या घशात दोन ते तीन ग्लास ओतल्याचा दावा तिनं केला.

दारुमध्ये गुंगीचं औषध मिसळण्यात आलं असावं असा संशय पीडितेनं व्यक्त केला. थोडी शुद्ध आली त्यावेळी लोंढे आणि उपाध्याय यांना कपडे काढताना पाहिल्याचं पीडितेनं सांगितलं. लोंढे यानं शरीर संबंध ठेवले आणि उपाध्यायनं लैंगिक अत्याचार केल्याचं तिनं तक्रारीत नमूद केलं आहे.
देवा मला माफ कर! मंदिराबाहेर चपला काढल्या, हात जोडले, दानपेटी घेऊन चोर फरार झाला अन्…
दुष्कृत्य केल्यानंतर २४ तासांनी दोघांनी मला घरी सोडलं. या प्रकरणाची माहिती मी पतीला दिली. त्यानंतर दोघांनी ऑनलाईन तक्रार नोंदवली. लोंढे आणि उपाध्याय फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here