पुणे: पुण्यातील तुरुंगातून बुधवारी मध्यरात्री पाच कैदी फरार झाल्यानं खळबळ उडाली आहे. देवगण चव्हाण, अक्षय चव्हाण, गणेश चव्हाण, अजिंक्य कांबळे आणि सनी पिंटो अशी पळालेल्या कैद्यांची नावे आहेत.
तुरुंग प्रशासनानं याबाबत माहिती दिली आहे. कारागृहाच्या इमारत क्रमांक चारच्या पहिल्या मजल्यावरील पाचव्या खोलीत हे पाच जण होते. रात्रीच्या सुमारास खोलीच्या खिडकीचे गज उचकटून व तोडून टाकून ते पळून गेले. हा प्रकार घडला तेव्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक सुयश जोशी व नितिन शिंदे हे त्यावेळी रात्रपाळीच्या ड्युटीवर होते. पळून गेलेल्यांपैकी तिघे दौंड तालुक्यातील रहिवासी असून एक हवेली तालुक्याचा तर एक शहरातील राहणारा आहे. त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणानुसार दौंड, लोणी-काळभोर व वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times