रत्नागिरी :साहिल मोरे याने केलेल्या आत्महत्या प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता असून साहिल मोरे याच्या बहिणीने संशयित मिताली अरविंद भाटकर (रा. तोणदे, रत्नागिरी) हिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. संशयित मिताली हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. (a case has been registered against sahil more’s friend)

साहिल संशयित मिताली भाटकरला लग्नाबाबत विचारणा करत होता. पण ती त्याला लग्नासाठी नकार देत होती. शेवटी आपली आणि आपल्या कुटुंबाची बदनामी होईल, या भितीने साहील मोरेने गळफास घेत आत्महत्या केली. आपल्या भावाला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्यामुळे साहिल मोरेच्या बहिणीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार संशयित मिताली अरविंद भाटकर (रा. तोणदे, रत्नागिरी) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीन प्रोजेक्ट हातचे गेले, म्हणून ‘या’ प्रकल्पासाठी धावाधाव, सामंतांनी भावाला मैदानात उतरवलं
मागील काही दिवसांपूर्वी साईभूमीनगर येथे साहील विनायक मोरे (वय २४, राहणार अलावा, रत्नागिरी) याने गळफास घेत आत्महत्या केली होती. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी साहिलची बहीण ऋतिका विनायक मोरे (वय २८, रा. जाकिमिऱ्या अलावा, रत्नागिरी) हिने बुधवार, २६ ऑक्टोबर रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनुसार, २१ ऑक्टोबर रोजी सकाळी साहिल मितालीला भेटण्यासाठी साईभूमीनगर येथील तिच्या मैत्रिणीच्या फ्लॅटवर गेला होता. त्यावेळी मितालीसोबत तिची आरती नावाची मैत्रीणही तिथेच होती. साहिल हा मितालीला लग्नाबाबत विचारणा करत होता. परंतु, मिताली त्याला नकारच देत होती.

Tata-Airbus: महाराष्ट्रातील आणखी एक प्रकल्प गुजरातला, उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले….
दरम्यान, याप्रकरणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साहिल मोरेच्या मृत्यूने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. मांजराच्या गळ्यात घातल्या जाणाऱ्या पट्ट्याने आत्महत्या होऊ शकते का? फॅनला हा पट्टा बांधून आत्महत्या केली, पण फॅन खाली कसा आला नाही? आत्महत्या झाली त्यावेळी तिथे कोणी नव्हते, मग यावेळी आत्महत्या करताना ती मैत्रीण कुठे होती, असे काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. किचनमधील सूरी सापडली असून या सुरीने पट्टा कापल्याचे मैत्रीणीने दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

एमआयडीसीच्या गराजमधून मित्र अल्टो गाडी घेऊन येऊ शकतो. त्या गाडीतून साहिलला दवाखान्यात आणलं जातं, मग मदतीसाठी शेजारच्यांना का बोलवलं गेलं नाही, असे काही प्रश्न याप्रकरणी तपासात उपस्थित झाले आहेत. पण याप्रकरणी ठोस पुरावा दिसत नसल्याने शवविच्छेदन अहवाल पेंडींग ठेवत व्हिसेरा पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे.

सहा महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न, दिवाळीसाठी पत्नीसोबत गावी आला पण होत्याचं नव्हतं झालं!
त्या युवकाचा घातपात की आत्महत्या हा प्रश्न आहे. कारण वैद्यकीय अहवालानुसार गुदमरून जीव गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला असून याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शांताराम महाले करत आहेत.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here