बीड: बँकेतून पैसे काढून दुचाकीवरून जात असताना समोरुन आलेल्या दोन भामट्यांनी तुमचे पैसे खाली पडले आहेत, असे म्हणत लक्ष विचलीत करत एकाने पैशाची बॅग घेवून पळ काढल्याची घटना काल दुपारी २.१५ च्या सुमारास एसबीआय बँक शाखा एस.पी ऑफिस समोर घडली.

गौतम भास्कर घुमरे (वय ४७, रा.तिरुपती नगर, मुक्ता लॉन्सजवळ बीड) या नोकरदाराने एसबीआय बँक शाखा शिवाजीनगर एसपी ऑफिस बीड समोरील बँकेतून काल दुपारी ६० हजार रुपये काढले होते. ते पैसे त्यांनी टिफिनच्या बॅगमध्ये ठेवून ती बॅग दुचाकीच्या हॅन्डलला लावली. त्यावेळी समोरुन आलेल्या दोन भामट्यापैकी एकाने तुमचे पैसे खाली पडले आहेत असे म्हटले, त्यानंतर घुमरे हे पैसे घेण्यासाठी खाली वाकताच दुसर्‍या भामट्याने बॅग घेवून पळ काढला.

महागाईच्या यादीत पाण्याची भर; मुंबईकरांच्या पाणीपट्टीत ७.१२ टक्क्यांपर्यंत वाढ, बघा किती वाढणार बिल
ही घटना भर दूपारी एसपी ऑफिससमोर घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसात अज्ञात दोन भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस नाईक मुजावर हे करत आहेत.

टाटा एअरबस पाठोपाठ नागपूरचा हा एक हजार कोटींचा प्रकल्पही गेला, ६०० जणांचा रोजगार बुडाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here