‘एकनाथ शिंदेंची कारकीर्द घडवण्यात नार्वेकरांचा वाटा’
‘मिलिंद नार्वेकर हे एक व्यक्ती म्हणून सगळ्यांना प्रिय आहेत. जर मिलिंद नार्वेकरांना आमची गरज भासली तर नक्कीच आम्ही सगळेजण नार्वेकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. एक व्यक्ती म्हणून नार्वेकरांचे राजकारणापलीकडे सर्वांशी चांगले संबंध आहेत. राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलो त्यावेळी त्यांनीच माझी भेट उद्धव ठाकरे यांच्याशी करून दिली होती. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकीर्द घडवण्यातही मिलिंद नार्वेकर यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे नार्वेकर यांचे शिंदे गटासोबतच नव्हे तर सर्वच राजकीय पक्षांसोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवावर जर कोणी उठलं असेल किंवा कोणी वाईटावर असेल तर आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहू,’ असं सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, मिलिंद नार्वेकर हे एमसीएमध्ये सर्वाधिक मतांनी निवडून आले आहेत. त्यांचे मेरिट तथा क्रेडिट आहे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. नार्वेकर यांच्यासारखी व्यक्ती जर मला सापडली असती तर मी रोज सकाळी-संध्याकाळी त्यांचं कौतुक केलं असतं. पण नार्वेकर यांचं कौतुक केल्यामुळे काही लोकांना भीती वाटते, असा टोला देखील यावेळी उदय सामंत यांनी लगावला आहे.