नवी दिल्ली : T20 विश्वचषकात भारताचा सुपर-१२ फेरीतील तिसरा सामना आज दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. हा सामना पर्थमध्ये होणार आहे. भारत आपले पहिले दोन सामने जिंकून गट-२ च्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे, तर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत हा सामना जो संघ जिंकेल तो संघ गटात पहिल्या स्थानावर येईल. पर्थच्या वेगवान आणि उसळत्या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांसमोर भारताच्या फलंदाजांची मोठी परिक्षा आहे. केवळ गोलंदाजच नाही तर आफ्रिकेचा एक फलंदाजही भारतासाठी धोकादायक ठरु शकतो. दक्षिण आफ्रिकेच्या संघात ६ वर्षांनंतर पुनरागमन करणारा हा फलंदाज आता विरोधी संघांवर कर्दनकाळ बनत तुटून पडत आहे. रिलो रुसो असे या फलंदाजाचे नाव आहे.

रिलो रुसो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. T20 विश्वचषकातील शेवटच्या सामन्यात त्याने बांगलादेशविरुद्ध १०९ धावा केल्या यावरुन याचा अंदाज येतो. यासह, T20 मध्ये सलग दोन शतक करणारा तो फ्रान्सच्या गुस्ताव्ह मॅककॉननंतर दुसरा फलंदाज ठरला. या महिन्याच्या सुरुवातीला भारताविरुद्ध इंदौर T20 मध्ये त्याने शतक झळकावले होते. आंतरराष्ट्रीय T20 मधील त्याचे हे पहिले शतक आहे. जेव्हापासून तो दक्षिण आफ्रिका संघात परतला आहे, तेव्हापासून तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. गेल्या ७ डावांमध्ये रुसोने दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहे.

Ind vs SA T20 World Cup: वर्ल्डकपमधील सुपर संडे मॅच; भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना अगदी फ्रीमध्ये पाहा
भारताविरुद्ध T20 मध्ये शतक झळकावण्यापूर्वी जुलैमध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध नाबाद ९६ धावांची खेळी केली होती. त्याचे शतक अवघ्या ४ धावांनी हुकले.

रुसोने T20 मध्ये ५ शतके झळकावली आहेत आणि ही पाच शतके २०१९ नंतर झाली आहेत. या कालावधीत त्याने ३९ च्या सरासरीने आणि १५७ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. २०१९ पूर्वी त्याची सरासरी २६ आणि स्ट्राइक रेट १३१ होता. म्हणजेच गेल्या ३ वर्षात T20 मधील त्याचा खेळ पूर्णपणे बदलला आहे. अशा स्थितीत भारताला पर्थमध्ये रुसोपासून दूर राहावे लागणार आहे. रुसोला येथील वेगवान आणि उसळणारी खेळपट्टी चांगली साथ देईल. त्याने २०१४, २०१५ आणि २०१६ च्या तुलनेत यावर्षी आंतरराष्ट्रीय T20 मध्ये जास्त धावा केल्या आहेत.

रुसोने एकूण T20 च्या २५६ डावांमध्ये ३१ च्या सरासरीने ६८४२ धावा केल्या आहेत. त्याने ५ शतके आणि ४२ अर्धशतके केली आहेत. त्याने T20 मध्ये २६८ षटकार मारले आहेत. अशा स्थितीत टीम इंडियाला या फलंदाजाला लवकर आऊट करावे लागेल.

वर्ल्डकपमध्ये भारताचा सामना आज दक्षिण आफ्रिकेशी, काय आहे खेळपट्टीचा अंदाज? पाहा कधी सुरू होणार…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here