पुणे : पुण्यात गुन्हेगारी सामान्यांना जगून देणार नाही अशी परिस्थिती झाली आहे. काल शनिवारी मध्यरात्री १२ वाजता गारवा बिर्याणीच्या मॅनेजरला अडवून धायरी येथे त्याची हत्या करण्यात आली. काम संपल्यानंतर दुचाकीवर घरी जात असताना अज्ञातांनी डोक्यात वार करुन त्याची हत्या केली. हत्या करणारे आरोपी फरार असल्यामुळे ही हत्या का झाली याचं कारण अद्याप कळू शकलेले नाही.

भरत भगवान कदम (वय २४, रा. धायरेश्वर प्राईड, मतेनगर, धायरी, पुणे) असे हत्या झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ प्रकाश भगवान कदम यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Kailas Patil : ठाकरेंचे आमदार कैलास पाटील यांचे आमरण उपोषण स्थगित, पीक विम्यासाठी होते आंदोलन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत कदम हा गारवा बिर्याणी येथे मॅनेजर म्हणून काम करत होता. शनिवारी रात्री काम संपल्यानंतर तो दुचाकीवरुन घरी जात होता. यावेळी धायरेश्वर मंदिर ते पारे कंपनी चौक रस्त्यावरील निर्मिती असोसिएट्स बिल्डिंगच्या समोरील गायकवाड यांच्या रिकाम्या प्लॉटजवळ हल्लेखोरांनी भरतला अडवलं. त्यानंतर त्यांनी त्याच्या डोक्यात सपासप वार केले. त्यात तो तेथेच जखमी अवस्थेत पडला त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन पळून गेले.

या संपूर्ण घटनेची माहिती धायरी मार्शल यांना मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास मिळाली. सिंहगड रस्ता पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेव्हा भरत कदम याचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. तेथेच त्याच्याजवळ त्याची दुचाकी मिळून आली. तसेच त्याच्या खिशातील पैसे, पाकिट व अन्य साहित्यही तसेच होते. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाला नसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. भरत कदम याच्या हत्येमागील नेमके कारण काय याचा शोध पोलीस घेत आहेत.

सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल पवार व सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या आहेत. तसेच आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना झाली आहेत.
दक्षिण आफ्रिकेचं ‘ट्रम्प कार्ड’ भारतासाठी ठरणार डोकेदुखी; आजच्या मॅचमध्ये सर्वात मोठे चॅलेंज कोणते?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here