Maratha Morcha : गेल्या २५ वर्षांपासून मी समाजासाठी काम करीत आहे. माझी नाहक बदनामी करण्याचा घाट ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून घालण्यात आला आहे. त्यामुळे मी व्यथित होऊन आत्महत्येचा पर्याय निवडला होता.

रमेश केरे पाटील यांनी विष प्राशन करण्याआधी आपल्यावर होत असलेल्या विविध आरोपांबाबत स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले की, “मागील २० वर्षांपासून मी मराठा समाजातील विविध प्रश्नांवर लढा देत आहेत. मी कधीही समाजाला विकण्याचं काम केलेलं नाही. चंद्रकांत पाटील यांच्या संदर्भातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर माझ्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोकांनी गंभीर आरोप केले. मात्र, मी कधीही कोणाकडून एक रुपयाही घेतलेला नाही”, असं म्हणत केरे पाटील यांनी आपली बाजू मांडली.
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चेनंतर उपोषण मागे | कैलास पाटील
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.