वाशिम : शहरातील हिंगोली महामार्गावरील गुलाटी तोलकाट्यासमोर एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अमोल अशोक सारडा (रा. अनसिंग ता. वाशिम) या २५ वर्षीय युवकाचा डोक्याला मार लागून मृत्यू झाला आहे. अमोल हा मित्राच्या भेटीसाठी जात होता. मात्र वाटेतच दुचाकी एसटी बसला धडकून अपघातात त्याने जागीच प्राण गमावले.
दरम्यान, अमोल सारडा याच्या अपघाती मृत्यूने दोन मित्रांची आयुष्यात आता कधीच भेट होऊ शकणार नाही. अत्यंत हुशार व मनमिळाऊ असलेल्या अमोलच्या निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.