Gujarat News: तरुणांमध्ये फायर हेअरकटची क्रेझ वाढली आहे. फायर हेअरकटचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या प्रकारात केस पेटवले जातात आणि त्यानंतर केस कापण्यात येतात. मात्र गुजरातच्या वलसाडमध्ये एका तरुणाला फायर हेअरकट महागात पडला आहे.

पीडित तरुण वापीच्या भद्रक मोरा परिसराचा रहिवासी आहे. त्याची छाती आणि गळा गंभीररित्या भाजल्याचं वापी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यानं सांगितलं. न्हावी आणि पीडित तरुणाचा जबाब नोंदवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी करम सिंह मकवाना यांनी दिली. पीडित तरुणाला वलसाडच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला सूरतच्या रुग्णालयात हलवण्यात आलं.
तरुणाच्या केसांमध्ये केमिकल लावण्यात आलं होतं. त्यानं पेट घेतल्यानं तरुणाच्या शरीराचा वरचा भाग भाजल्याची माहिती प्राथमिक तपासातून मिळाल्याचं पोलिसांनी सांगितलं. फायर हेअरकटसाठी न्हाव्यानं कोणतं तेल वापरलं होतं त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.