Caught the leopard : रविवारी आरेच्या युनिट १५ येथील पिंजऱ्यामध्ये पकडण्यात आलेला बिबट्या सी ५६ असून त्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ठेवले आहे. सोमवारी इतिका लोटे या १६ महिन्यांच्या मुलीच्या मृत्यूनंतर मानव-प्राणी संघर्षासाठी कारणीभूत असलेला बिबट्या हाच आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

हायलाइट्स:
- आरेमध्ये आणखी एक बिबट्या पिंजऱ्यात
- बिबट्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ठेवले आहे
- एका १६ महिन्यांच्या मुलीचा या बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता
रविवारी आरेच्या युनिट १५ येथील पिंजऱ्यामध्ये पकडण्यात आलेला बिबट्या सी ५६ असून त्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ठेवले आहे. सोमवारी इतिका लोटे या १६ महिन्यांच्या मुलीच्या मृत्यूनंतर मानव-प्राणी संघर्षासाठी कारणीभूत असलेला बिबट्या हाच आहे का, याचा शोध घेतला जात आहे. याआधी बुधवारी सी-५५ या नर बिबट्याला युनिट १६ जवळून पकडण्यात आले होते.
हा बिबट्या तीन वर्षांचा आहे. या परिसरामध्ये मानव-प्राणी संघर्षासाठी तीन बिबट्यांबद्दल शक्यता व्यक्त केली जात आहे. यात दोन नर बिबटे आणि एका मादी बिबट्याचा समावेश आहे. ही तीनही भावंडे आहेत. यातही मानव-प्राणी संघर्षासाठी नर बिबट्या कारणीभूत असल्याची अधिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दोन्ही बिबट्यांना पकडले तरी या परिसरामध्ये पेट्रोलिंग आणि कॅमेरा ट्रॅप येत्या काळात कायम असतील, असे वनविभागातर्फे स्पष्ट करण्यात आले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.