मुंबई : फोर्ब्स रिअल टाईम बिलियनर्स (Forbes Real Time Billionaires) इंडेक्सनुसार, आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांनी टॉप-१० अब्जाधीशांच्या यादीत मोठी झेप घेतली आहे. १३१.३ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह अदानी जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे. अॅमेझॉनचे जेफ बेझोस यांना मागे टाकून अदानी यांनी तिसरे स्थान पटकावले आहे.

मुहूर्ताच्या वेळी बाजारावर लक्ष्मी प्रसन्न; अदानी-अंबानी मालामाल तर एलॉन मस्क यांना फटका
इलॉन मस्क अव्वल, बर्नार्ड अर्नॉल्ड दुसऱ्या क्रमांकावर
टेस्ला सीईओ एलोन मस्क, ज्यांनी अलीकडेच ४४ अब्ज डॉलर ट्विटर डील पूर्ण केली, फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीश निर्देशांकात पहिल्या क्रमांकावर आहे. मस्क यांची एकूण संपत्ती २२३.८ अब्ज डॉलर आहे. त्याचबरोबर फ्रेंच अब्जाधीश बर्नार्ड अर्नोल्ड या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती १५६.५ अब्ज डॉलर आहे.

गेल्या दिवाळीपासून अदानींच्या ३ कंपन्यांनी दिला मल्टिबॅगर परतावा, स्टॉकची नावं नोट करा!
मुकेश अंबानी आठव्या क्रमांकावर
या यादीत स्थान मिळवणारे दुसरे भारतीय उद्योगपती रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी आहेत. या यादीत ते आठव्या क्रमांकावर आहे. त्यांची एकूण संपत्ती ८९.२ अब्ज डॉलर आहे. या यादीत वॉरेन बफे यांनी पाचव्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. त्यांची एकूण संपत्ती १०४.५ अब्ज डॉलर आहे. सहाव्या क्रमांकावर मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स आहेत. त्यांची एकूण संपत्ती १०२.९ अब्ज डॉलर आहे. मार्क झुकरबर्गच्या संपत्तीत झपाट्याने घट झाली असून, या यादीत त्यांची घसरण २९ व्या क्रमांकावर झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here