Maharashtra Politics | रवी राणा हे रविवारी रात्री वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते. त्यावेळी साडेतीन तास चर्चा झाली होती. यानंतर आज सकाळी रवी राणा पुन्हा एकदा फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहोचले. याठिकाणी काही काळ चर्चा झाल्यानंतर रवी राणा हे सागर बंगल्यातून बाहेर पडेल.

 

Bacchu Kadu Ravi Rana
बच्चू कडू आणि रवी राणा

हायलाइट्स:

  • बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाण्यासाठी ५० खोके घेतले होते, असा आरोप रवी राणा यांनी केला होता
  • या वक्तव्यासाठी बच्चू कडू यांनी माफी मागितली
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू आणि माझ्यात वाद सुरु होता. मतभेद झाल्यानंतर माझ्या तोंडातून गुवाहाटीसंदर्भात काही वाक्यं निघाली. या वाक्यांमुळे बच्चू कडू आणि शिंदे गटातील आमदार दुखावले गेले असतील तर मी त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. मी बच्चू कडू यांच्यासंदर्भात केलेले वक्तव्य मागे घेत आहे. बच्चू कडू यांनीही माझ्याविषयी अपशब्द आणि न पटणारी भाषा वापरली होती. तेदेखील त्यांची ही वक्तव्य माघारी घेतील, असे सांगत अपक्ष आमदार रवी राणा यांनी आपली तलवार म्यान केली. रवी राणा हे रविवारी रात्री वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते. त्यावेळी साडेतीन तास चर्चा झाली होती. यानंतर आज सकाळी रवी राणा पुन्हा एकदा फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहोचले. याठिकाणी काही काळ चर्चा झाल्यानंतर रवी राणा हे सागर बंगल्यातून बाहेर पडेल. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यासोबतच्या वादाला मूठमाती देत असल्याची घोषणा केली.

मी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. साडेतीन तास ही बैठक सुरु होती. काही मतभेद होते, काही विचार, भाष न पटणारी होती. त्यावरही चर्चा झाली. बच्चू कडू माझ्यासोबत अमरावती जिल्ह्यातील आमदार आहेत. शिवसेनेतील आमदार आणि बच्चू कडू माझे सहकारी आहेत. त्यामुळे वाद सुरु असताना तोंडातून काही वाक्य निघालं असेल तर मी ते वक्तव्य मागे घेतो. आम्ही दोघे सरकारसोबत आहोत. आमच्या वादापेक्षा महाराष्ट्राचा विकास महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी हा विषय इथेच संपवत आहे. माझ्या शब्दाबद्दल कोणाला काही आक्षेप असेल, कुणी दुखावलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. देवेंद्र फडणवीस हे माझे नेते आहेत, त्यांचा आदेश माझ्यासाठी सर्वस्व आहे. त्यामुळे मी गुवाहाटीसंदर्भात केलेले माझे वक्तव्य मागे घेत आहे, असे रवी राणा यांनी सांगितले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here