नेवासा तालुक्यात चांदा गावाजवळ लोहारवाडी येथे ही घटना घडली आहे. वस्तीवर राहणाऱ्या अनिल पुंड यांनी घराजवळील शेतात मध्यरात्रीच्या सुमारास सरण रचले. काही लाकडे आणि ठिबक सिंचनासाठी वापरण्यात येणारे पाईप वापरुन त्याने सरण रचले. त्यानंतर त्यावर तारेने स्वत:ला बांधून घेतले आणि त्यानंतर पेटवून घेतले, असं प्रथमदर्शनी पोलिसांना आढळून आलं आहे. त्याने लिहून ठेवलेली चिठ्ठी आणि मोबाईल संदेश यावरुन आत्महत्या असावी असा अंदाज बांधला जात आहे. तरीही नेमके काय घडले असावे? याचा सखोल तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
श्रीरामपूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उप.अधीक्षक संदीप मिटके यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरु केला आहे. सोनई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी अनिलचे आई-वडील बाहेरगावी गेलेले होते. तेव्हा घरी एकटाच असलेल्या अनिलने रविवारी मध्यरात्री हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे.
रात्री दीड वाजेच्या सुमारास त्याने मोबाईलवरुन आपण आत्महत्या करत असल्याचा मेसेज आपल्या बहीण व मावशीला पाठवला होता. याशिवाय त्याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत मोबाईलचे लॉक कसे उघडायचे हेही लिहून ठेवले होते. अनिलने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये माझ्या मरणाला मी स्वतःच कारणीभूत असल्याचे म्हटलं आहे. असे असले तर त्याला हे शक्य कसं झाले यासंबंधी ग्रामस्थही शंका व्यक्त करत आहेत.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या बॉलिंगवर खासदार इम्तियाज जलील क्लीन बोल्ड