चित्रदुर्ग : कर्नाटकातील चित्रदुर्ग शहरात एका १२ वर्षीय मुलाचा फाशी घेऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गेल्या शनिवारी संध्याकाळी मुलगा त्याच्या घरी शाळेच्या कार्यक्रमाची तयारी करत होता. मुलाला स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांची भूमिका करायची होती, म्हणून तो फाशीच्या शिक्षेची रिहर्सल करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय गौडा हा मुलगा घटनेच्या वेळी घरी एकटाच होता. तर त्याचे आई-वडील नागराज आणि भाग्यलक्ष्मी हे शहरातील केळगोट बडावणे परिसरात होते. जिथे ते दोघे थिप्पाजी सर्कलजवळ भोजनालय चालवतात.

बडावणे पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक केआर गीतम्मा यांनी TOI ला दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यासोबतची घटना रात्री ९ च्या सुमारास घडली. त्याची आई हॉटेलमधून परतल्यावर हे समोर आलं. आई घरी येताच घराचा दरवाजा आतून बंद दिसला. यानंतर मुलाच्या आईने शेजाऱ्यांना बोलावून दरवाजा ठोठावला. त्यानंतरही काहीच हालचाल न झाल्याने शेजाऱ्यांनी खिडकीतून पाहिले असता मुलगा पंख्याला लटकलेला दिसला.

‘जर हे मान्य केलं असतं तर आज इंदिरा गांधी जिवंत असत्या’ वाचा त्या अखेरच्या दिवसाची INSIDE STORY
घटनेची माहिती मिळताच मुलाची आई भाग्यलक्ष्मी यांनी पती नागराजला फोन केला, त्यानंतर घरी पोहोचलेल्या नागराजने मास्टर चावीने दरवाजा उघडला. आई-वडील आणि शेजाऱ्यांनी संजयला शासकीय रुग्णालयात नेले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, मुलाने दोरीने फास बांधला आणि भगतसिंग यांना फाशी देण्याची रंगीत तालिम करत होता. विद्यार्थ्याने आधी त्याचे डोके हुडमध्ये ठेवले आणि नंतर कॉटवरून उडी मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचा आरोप आहे.

नवी मुंबई हादरली! आईने लेकरांवरच केला अघोरी प्रकार, चिमुरड्यांना संपवून पुढे जे केलं ते भयंकरच…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here