एक व्यक्ती रातोरात कोट्याधीश झाला. त्याच्या बँक खात्यात २०० कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा झाली. मात्र त्यानं ही बाब त्याच्या कुटुंबियांना सांगितली नाही. आपल्या पत्नी आणि मुलांपासूनही त्यानं ही गोष्ट लपवून ठेवली. यामागचं कारण कोट्याधीश व्यक्तीनं सांगितलं आहे.

दोन अब्ज रुपयांची लॉटरी लागल्याचं कुटुंबाला समजल्यास ते मग्रूर आणि आळशी होतील असं संबंधित व्यक्तीला वाटलं. त्यामुळे त्यानं लॉटरीबद्दल पत्नी आणि मुलांना सांगितलं नाही. लॉटरी जिंकणारी व्यक्ती दक्षिण चीनच्या गुआंग्शी प्रांताची रहिवासी आहे. त्यानं लॉटरीत २२० मिलियन युआन म्हणजेच २ अब्ज ५० कोटी रुपये जिंकले. त्यानं लॉटरीची ४० तिकिटं खरेदी केली होती. त्यातील ७ तिकिटांवर तो बक्षिसं जिंकला. विजेत्यानं २४ ऑक्टोबरला २ अब्ज ५० कोटी रुपये गुआंग्शी वेल्फेअर लॉटरी डिस्ट्रीब्यूशन सेंटरमध्ये स्वत:च्या ताब्यात घेतले. यातील ५ मिलियन युआन म्हणजेच १५ कोटी रुपये त्यानं दान केले.
कारच्या बोनेटवर बसून फटाके फोडले; पोलिसांनी शोधून काढले अन् जन्माची अद्दल घडवली, पाहा VIDEO
बक्षिसाची रक्कम स्वीकारताना विजेत्यानं कार्टूनचा पोशाख घातला होता. ओळखीच्या व्यक्ती, कुटुंबीय ओळखू नये यासाठी तो कार्टूनचा पोशाख घालून गेला होता. बक्षीस जिंकल्याबद्दल त्यानं आनंद व्यक्त केला. मी माझा आनंद लपवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण मी याबद्दल मी माझ्या कुटुंबाला, मित्र परिवाराला सांगितलेलं नाही. माझ्या पत्नी आणि मुलांनादेखील याची कल्पना नाही. आपण अब्जाधीश झाल्याचं कळल्यावर कदाचित त्यांना गर्व चढेल, त्यांना माज येईल. ते स्वत:ला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजू लागतील. भविष्यात मेहनत करणार नाहीत. मुलं अभ्यासात फारसं लक्ष देणार नाहीत, अशी चिंता मला वाटते, असं अब्जाधीशानं सांगितलं.
VIDEO: केमिकल टाकलं, माचिस पेटवली; फायर हेअरकट महागात पडला; तरुण गंभीररित्या भाजला
इतक्या मोठ्या रकमेचं काय करणार असा प्रश्न अब्जाधीशाला विचारण्यात आला. त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचं त्यानं सांगितलं. पैशांचा वापर कुठे आणि कसा करायचा याबद्दलची योजना आखण्यासाठी थोडा वेळ लागेल, असं तो म्हणाला. त्यानं ५ मिलियन युआन दान केले आहेत. ४३ मिलियन युआन कर म्हणून कापला गेल्यानंतर त्याला १७१ मिलियन युआन मिळाले. ही रक्कम भारतीय रुपयात १ अब्ज ९३ कोटी रुपये इतकी होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here