Maharashtra Politics | डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवार पुढील तीन दिवस ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेतील. २ नोव्हेंबरला पवार यांना डिस्चार्ज मिळेल. या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयाच्या आवारात गर्दी करु नये, अशा सूचना पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. शरद पवार यांना काहीतरी त्रास जाणवत असल्याने त्यांनी उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे.

हायलाइट्स:
- शरद पवार यांची प्रकृती बिघडली
- ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार
गेल्यावर्षी मार्च महिन्यात शरद पवार यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पोटदुखीच्या त्रासामुळं त्यांना मंगळवारी रात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पित्ताशयात खडे तयार झाल्याने त्यांच्या पोटात दुखत असल्याचे निदान झाले होते. नंतर एन्डोस्कोपीद्वारे त्यांच्या पित्ताशयातील खडे काढून टाकण्यात आले होते.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.