नवी दिल्ली : जगावर रोगराईचं संकट आहे. अशात जीवघेण्या संसर्गाने अनेकांचा जीव घेतला. पण आता मनुष्यचं आपला शेवट करणार असं चित्र पाहायला मिळत आहे. दिल्ली एनसीआरमध्ये वायू प्रदूषणाची पातळी सातत्याने वाढत आहे. राजधानी दिल्लीत सोमवारी एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) ३३९ नोंदवण्यात आला आहे. जी अत्यंत गंभीर श्रेणीत गणली जाते. राजधानीची हवा अतिशय विषारी झाली आहे. या वायू प्रदूषणामुळे मृत्यूचं तांडव सध्या सुरू आहे.

द लॅन्सेंट मेडिकल जर्नलच्या २०१९ च्या अहवालानुसार, जगभरात प्रदूषणामुळे ९ दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एकट्या भारतात वायू प्रदूषणामुळे १६ लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये वृद्धांची संख्या जास्त होती. फुफ्फुसाच्या कर्करोगासह श्वसनाचे अनेक धोकादायक आजार हवेच्या प्रदूषणामुळे होतात, असे या अभ्यासात सांगण्यात आले. ज्यामुळे मृत्यू वाढत आहेत.

धक्कादायक! भगतसिंग यांच्या फाशीची रंगीत तालीम करताना खरंच गेला जीव, १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
हा आजार इतका प्राणघातक आहे की, देशात दररोज ६ हजारांहून अधिक लोक प्रदूषणामुळे आपला जीव गमावत आहेत. डॉक्टर सांगतात की, प्रदूषणामुळे फुफ्फुसाशिवाय हृदयाला अनेक समस्या निर्माण होतात. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशननुसार, वायू प्रदूषणामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

प्रदूषणामुळे अनेक आजारांचा धोका वाढला…

वायू प्रदूषण मोठे आव्हान पुढे आहे. हे गंभीर असल्याचं ज्येष्ठ फिजिशियन डॉ. अरुण शहा यांनी सांगितलं. विशेषत: थंडीच्या हंगामात प्रदूषणाची समस्या खूप वाढते. हवा खराब होण्यास सर्वाधिक कारणीभूत ठरणारे खड्डे आणि वाहनांचे प्रदूषण. प्रदूषणामुळे देशाचे आर्थिक नुकसानही होत आहे. करोनाच्या महामारीनंतर श्वसनाच्या रुग्णांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे.

‘जर हे मान्य केलं असतं तर आज इंदिरा गांधी जिवंत असत्या’ वाचा त्या अखेरच्या दिवसाची INSIDE STORY
डॉ. शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, वायू प्रदूषणात असलेले कण (PM2.5) अनेक रोगांचा धोका वाढवतात. जर एखाद्या व्यक्तीला आधीच दमा, ब्राँकायटिस किंवा सीओपीडीची समस्या असेल तर प्रदूषणामुळे ती वाढते. या ऋतूमध्ये दम्याच्या रुग्णांना दम्याचा झटका येतो.

वायू प्रदूषण कसं टाळावं…
– बाहेर जाताना मास्क घाला
– धूळ आणि धुक्यापासून संरक्षण
– खाताना काळजी घ्या, स्वच्छ आणि आरोग्याला योग्य असे अन्न खा.
– मॉर्निंग वॉक टाळा
– तुम्ही घरात एअर प्युरिफायर लावू शकता…
– तुम्हाला दमा असल्यास नेहमी तुमच्यासोबत इनहेलर ठेवा.
– श्वास घेण्यास त्रास होत असल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा

नवी मुंबई हादरली! आईने लेकरांवरच केला अघोरी प्रकार, चिमुरड्यांना संपवून पुढे जे केलं ते भयंकरच…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here