विजय आणि सारिका यांचा बारा वर्षांपूर् प्रेमविवाह झाला. मात्र दोघांच्या सुखी संसारात फेसबुक वरील मैत्रीने विघ्न आणले. सारिकाची फेसबुकवरून सागरशी मैत्री झाली. पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. सागर आणि सारिका यांचं एकीकडे प्रेमप्रकरण सुरू होते तर दुसरीकडे सारिकाच्या संसारात पतीसह वादविवाद होत होते. यामुळे चार महिन्यांपूर्वी सारिका तिच्या पतीपासून विभक्त झाली. पती विजय वृद्ध आईसह राहत होता तर सारिका तिच्या आईच्या घरी राहत होती. मात्र गेल्या काही दिवसापासून विजय सारिकाकडे सोबत राहण्याचा तगादा लावत होता. तिच्या घरी जाऊन वारंवार समजावत होता. मात्र सारिकाला पती विजयसोबत रहायचे नव्हते.
सारिकाने सागरच्या मदतीने विजयच्या हत्येचा कट रचला. पती विजयला कॉल करून आपण बाहेर फिरायला जाऊ असे म्हणत सारिकाने बोलावले. तत्पूर्वी सारिकाने एक स्प्रे आणि धारदार चाकू खरेदी करून स्वत:जवळ ठेवला होता. विजय भेटल्यावर सारिकाने पतीकडे दारू पिण्याची इच्छा व्यक्त केली. दोघेही शहरातील एका हॉटेलमध्ये गेले. तिथे दोघे दारु प्यायले. सारिका कमी दारू प्यायली. मात्र तिने पतीला जास्त दारू पाजली.
ठरल्याप्रमाणे सारिकाने पती विजयला सातारा परिसरातील निर्जनस्थळी नेले. दारूच्या नशेत असलेल्या पतीच्या डोळ्यावर स्प्रे मारला. तो खाली कोसळताच सारिकाने स्वतःजवळील धारदार चाकूने विजय वर वार केले. त्यात विजयचा मृत्यू झाला. हत्येनंतर प्रियकर सागरला घटनस्थळी बोलावून घेतले व दोघांनी मृतदेह झुडूपात फेकला. तब्बल बारा दिवसांनी विजयचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत नागरिकांना दिसला. शवविच्छेदन अहवालात हत्या झाल्याचे समोर आल्यानंतर औरंगाबाद गुन्हे शाखेने सखोल तपास करत हत्याकांडाचा उलगडा केला. पोलिसांनी सारिका आणि तिच्या प्रियकराला अटक केली असून या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Home Maharashtra wife kills husband, तुमच्यासोबत दारू प्यायचीय! माहेरी गेलेल्या पत्नीचा पतीला कॉल; १२...
wife kills husband, तुमच्यासोबत दारू प्यायचीय! माहेरी गेलेल्या पत्नीचा पतीला कॉल; १२ वर्षांच्या संसाराचा शेवट – wife takes life of husband with his boyfriend aurangabad police arrested both accused
औरंगाबाद: बारा वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला. मात्र काही महिन्यांपूर्वी फेसबुकवर तरुणाशी ओळख झाली, त्यातून प्रेम झाले. प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवले. हॉटेलमध्ये पतीला दारु पाजून निर्जनस्थळी नेऊन त्याची हत्या करण्यात आली. चाकूने भोसकून त्याला संपवण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यात औरंगाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे.