नवी दिल्ली : जन धन बँक खाते ही केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक होती. याद्वारे लोकांना नुकसान भरपाई आणि मदतीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात पाठवणे शक्य झाले आहे. प्रत्येक घरात एक बँक खातेदार असावे या उद्देशाने याची सुरुवात करण्यात आली होती. जन धन खाते अर्थातच बँकेत खाते उघडण्यासाठी आहे, पण याशिवाय या योजनेद्वारे इतरही अनेक फायदे सर्वसामान्यांपर्यंत पोहचवले जातात.

या पर्यायातून वाचवा तुमचा टॅक्स, बचतीसोबतच तुम्हाला मिळेल कमाईची उत्तम संधी
जर तुमच्याकडे सामान्य बँक खाते असेल तर तुम्ही त्याचे जन धन खात्यात रूपांतर करू शकता. सामान्य खाते जनधनमध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. आज आम्ही तुम्हाला सामान्य बँक खाते जन धन मध्ये रूपांतरित करण्याच्या प्रक्रियेबद्दल सांगणार आहोत. एकदा तुम्ही जन धन खाते उघडल्यानंतर तुम्ही त्याद्वारे सरकारच्या अनेक सुविधांचा लाभ घेऊ शकता.

करदात्यांनो खुशखबर; ITR भरण्याची मुदत वाढली, आता ‘या’ तारखेपर्यंत भरा आयकर रिटर्न
रूपांतर कसे करायचे?

  • तुम्हाला प्रथम बँकेच्या शाखेत जावे लागेल.
  • यानंतर, तेथे एक फॉर्म भरून तुमच्या खात्यावर रुपे कार्डसाठी अर्ज करा.
  • फॉर्म भरा आणि बँकेत जमा करा.
  • यानंतर तुमचे खाते जन धन खात्यात रूपांतरित होईल.

कामाची बातमी! आता विसरा टेन्शन; १० वर्षे खासगी नोकरी करून मिळणार पेन्शन; जाणून घ्या नियम
काय-काय फायदे मिळतील?
एकदा जन धन खाते उघडल्यास तुम्ही तुमच्या खात्यातून अतिरिक्त १०,००० रुपये काढण्यासाठी ओव्हरड्राफ्ट सुविधेचा वापर करू शकता. या योजनेमध्ये तुम्हाला २ लाख रुपयांपर्यंतचा अपघाती विमा आणि ३०,००० रुपयांपर्यंतचे जीवन संरक्षण दिले जाते. यासोबतच तुम्हाला या खात्यासोबत मोफत मोबाईल बँकिंग सुविधाही मिळते. याशिवाय सरकारी योजनांचा पैसा थेट या खात्यात पोहोचतो. बर्‍याच लोकांसाठी याचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात किमान शिल्लक ठेवण्याची कोणतीही अडचण नाही. मात्र, जर तुम्हाला चेकबुक हवे असेल तर तुम्हाला किमान शिल्लक राखावी लागेल. तुम्हाला खात्यासोबत डेबिट कार्ड देखील दिले जाते.

खाते उघडण्यास कोण पात्र?
१० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचा कोणताही भारतीय नागरिक जन धन खाते उघडू शकतो. तसेच हे संयुक्त म्हणून देखील उघडले जाऊ शकते. तुम्ही जवळच्या कोणत्याही बँकेत जाऊन तुमचे जन धन खाते उघडू शकता. यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन जन धन खात्याचा फॉर्म भरावा लागेल आणि तुमच्याबद्दल आवश्यक माहिती द्यावी लागेल. तुम्ही पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड क्रमांक आणि मतदार ओळखपत्राद्वारे जन धन खाते उघडू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here