मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील विविध नेत्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं. या पार्श्वभूमीवर आजा भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत सरकारची बाजू मांडली. तसंच सरकारवर करण्यात आलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत विरोधकांवरच गंभीर आरोप केले आहेत.

‘आमचं सरकार येऊन तीनच महिने झालेले असताना महाराष्ट्रातून उद्योग बाहेर जात आहेत, असं चुकीचं नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होतोय. या फेक नरेटिव्हमध्ये काही राजकीय पक्ष, त्यांची इकोसिस्टम आणि दुर्दैवाने चार-पाच पत्रकार या सगळ्यांनी एकत्रितपणे महाराष्ट्राच्या बदनामीचा घाट घातला आहे,’ असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.

धनंजय मुंडेंना सोडणार नाही, करुणा शर्मा रडत-रडत काय काय म्हणाल्या?

‘महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून नवी भेट’

महाराष्ट्रातील उद्योग दुसऱ्या राज्यांना नेले जात असल्याचा आरोप होत असतानाच केंद्र सरकारने महाराष्ट्राला २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला प्रकल्प दिला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे. ‘केंद्र सरकारने आजच महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर केलं आहे. पुण्यातील रांझणगाव येथे हा प्रकल्प होईल. तसंच महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक्स हब म्हणून भविष्यात विकसित केलं जाईल, अशी घोषणाही केंद्रीय मंत्र्यांनी केली आहे. इलेक्ट्रॉनिक्स हे भविष्य असल्याने केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिलेली ही भेटच आहे. नवीन वर्षात केंद्राकडून महाराष्ट्राला टेक्स्टाइल पार्कही दिलं जाईल, अशी मला अपेक्षा आहे,’ असं ते म्हणाले.

राज ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर टीका, मित्रवर्य आशिष शेलारांचं ‘शेलकं’ प्रत्युत्तर

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात भ्रष्टाचार, वसुली, गृहमंत्री तुरुंगात, पोलीस अधिकारी तुरुंगात अशी अनेक भयंकर प्रकरणे घडली. त्यामुळे महाराष्ट्रात कोणताही उद्योग यायला तयार नव्हता. महाराष्ट्राची ही जी विस्कटलेली घडी आहे ती जागेवर आणण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. मागच्याच कॅबिनेट बैठकीत आम्ही २५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावांना मान्यता दिली आहे. आज पुन्हा एकदा २५ हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव आमच्या सरकारने मंजूर केले आहेत, अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here