जळगाव : आपल्या आक्रमक शैलीतील भाषणामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे या राज्यभर दौरे करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांवर जोरदार टीका करत आहेत. याच सुषमा अंधारे यांना शिंदे गटातून पाचोरा तालुक्याचे आमदार किशोर पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शिंदे गटात गेलेल्या आमदारांमुळेच सुषमा अंधारे या अंधारातून उजेडात आल्या असून त्यांनी आम्हा सर्व आमदारांचे आभार मानावेत, असा टोला किशोर पाटील यांनी लगावला आहे.
दरम्यान, आमदार किशोर पाटील यांनी केलेल्या या टीकेवर सुषमा अंधारे या २ नोव्हेंबर रोजी पाचोरा येथे होणाऱ्या मेळाव्यात काय पलटवार करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.