शायनिंग मारण्यासाठी अनेकदा नको ते धाडस केलं जातं. मात्र शायनिंग मारणं अनेकदा अंगाशी येतं. असाच एक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाला फायर स्टंट करणं महागात पडला. स्टंट करताना चूक झाल्यानं तरुणाच्या दाढीनं पेट घेतला. घटनेचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला.

 

fire stunt
शायनिंग मारण्यासाठी अनेकदा नको ते धाडस केलं जातं. मात्र शायनिंग मारणं अनेकदा अंगाशी येतं. असाच एक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाला फायर स्टंट करणं महागात पडला. स्टंट करताना चूक झाल्यानं तरुणाच्या दाढीनं पेट घेतला. घटनेचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला. तो आतापर्यंत १ कोटी २० लाखांहून अधिक जणांनी पाहिला आहे.

टेबलवर असलेल्या तरुणाच्या हातात एक पेटती वस्तू दिसत आहे. तरुणाच्या डाव्या हातात पेट्रोलची बाटली आहे. त्या बाटलीतील पेट्रोल तरुण स्वत:च्या तोंडात भरतो. त्यानंतर उजव्या हातातील जळती वस्तू तोंडाजवळ आणून त्यावर तोंडातील पेट्रोलचा फवारा मारण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर हवेत मोठी आग दिसते. तरुणाची दाढी पेट घेते.


तोंडातील पेट्रोल जळत्या वस्तूवर पडताच मोठी आग दिसते. त्या आगीमुळे तरुणाची दाढी पेटते. आसपासचे तरुण लगेच मदतीला पुढे येतात. त्याच्या दाढीला लागलेली आग विझवतात. घटना नेमकी कुठे घडली ते अद्याप समजू शकलेलं नाही. हा व्हिडीओ आतापर्यंत १ कोटीहून अधिक जणांनी पाहिला आहे. व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी असे स्टंट्स टाळण्याचं आवाहन केलं आहे. तर काहींनी तरुणाच्या मदतीला आलेल्यांचं कौतुक केलं आहे.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here