पर्थ: टी-२० विश्वचषक स्पर्धेत काल भारताला दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा सामना करावा लागला. तर पाकिस्ताननं नेदरलँडला नमवत स्पर्धेतील आव्हान कायम राखलं. भारताच्या पराभवामुळे आता गट २ मध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे. बाबर आझमच्या संघाला अजूनही उपांत्य फेरीच्या आशा आहेत. भारतानं दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला असता तर पाकिस्तानसाठी समीकरण सोपं असतं. मात्र भारताच्या पराभवामुळे पाकिस्तानची वाट बिकट आहे.

आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतरही भारतासाठी उपांत्य फेरीचं समीकरण फारसं कठीण नाही. भारताचे दोन सामने शिल्लक आहेत. २ नोव्हेंबरला बांग्लादेश आणि ५ नोव्हेंबरला झिम्बाब्वेशी भारताचा सामना होईल. भारताचे सध्या ३ सामन्यांत ४ गुण आहेत. भारताचा नेट रनरेट ०.८४४ आहे. तर दक्षिण आफ्रिकेनं ३ सामन्यांत २ विजयांसह ५ गुण मिळवत गटात अव्वल स्थान पटकावलं आहे. त्यांचा नेट रनरेट २.७७२ आहे.
इजा बिजा तिजा अन्… भारत आफ्रिकेविरुद्ध पराभूत अन् चाहत्यांना सतावू लागली वेगळीच चिंता
भारतानं दोनपैकी दोन सामने जिंकल्यास उपांत्य फेरीचं दार उघडेल. दक्षिण आफ्रिकेला पाकिस्तान आणि नेदरलँड्सचा मुकाबला करायचा आहे. या दोनपैकी एका संघानं आफ्रिकेला हरवल्यास आणि भारतानं उर्वरित दोन सामने जिंकल्यास भारत गटात पहिल्या स्थानी पोहोचेल.
आप क्रोनोलॉजी समझिये! भारत वर्ल्डकप जिंकणार? ११ वर्षांपूर्वीच्या घटनांची डिट्टो पुनरावृत्ती
भारत दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाल्यानं पाकिस्तानची अवस्था बिकट आहे. पाकिस्तानचे दोन सामने शिल्लक आहेत. ते दोन्ही सामने त्यांना जिंकावेच लागतील. त्यांना आफ्रिका आणि बांग्लादेशवर विजय मिळवावा लागेल. याशिवाय भारत दोन्ही सामन्यात पराभूत व्हावा यासाठी प्रार्थना करावी लागेल.

नेदरलँड्सनं दक्षिण आफ्रिकेचा पराभव केल्यास पाकिस्तानला फायदा होईल. पाकिस्तानला नेट रनरेटवरही लक्ष ठेवावं लागेल. त्यात भारताला मागे टाकावं लागेल. दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्सचा सामना पावसामुळे रद्द झाल्यास पाकिस्तानला फायदा होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here