औरंगाबाद : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे मैत्रिणीला मारहाण केल्यामुळे पुन्हा अडचणीत आले आहेत. मैत्रीण इशा झा यांच्या तक्रारीवरून कन्नड शहर पोलीस ठाण्यात अदाखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एक व्हिडिओ इशा यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

इशा झा यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, हर्षवर्धन जाधव यांनी मला केस पकडून मारहाण केली. गेल्या अनेक दिवसांपासून ते माझं नाव कुणाशीही जोडतात. माझ्यावर संशय घेतात. एका मुलासोबत माझं नाव त्यांनी जोडले. मी पोलिसात याबाबत तक्रार दिली आहे. मी कन्नड सोडून जात आहे,’ असं सांगत ईशा झा यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. इशा यांच्या तक्रारीवरून औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड शहर पोलीस ठाण्यात अदाखलपात्र स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘फडणवीस महाराष्ट्राशी खोटं बोलले’; आदित्य ठाकरेंनी थेट पुरावे सादर करत सर्वच दावे खोडून काढले!

माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असतात. मनसेत असताना मंत्र्यांच्या ताफ्यात गाडी घातल्यामुळे वाद झाला होता. त्यानंतर पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप जाधव यांच्याकडून करण्यात आला. तसंच मुंबईला जाताना झालेल्या किरकोळ अपघातानंतर देखील पुणे शहराजवळ हर्षवर्धन जाधव यांचे भांडण झाले होते.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून माजी आमदार जाधव यांनी शहरातील मूलभूत प्रश्नांबाबत आंदोलन पुकारले होते. शिवाय उद्योगमंत्री उदय सामंत औरंगाबाद दौऱ्यावर असताना त्यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते पुन्हा राजकारणात सक्रिय होत असल्याचं दिसत होतं. मात्र आता मैत्रीण असलेल्या इशा झा यांनी पोलिसांत मारहाण केल्याची तक्रार दिल्याने ते पुन्हा अडचणीत सापडले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here