सोलापूर : सांगोला तालुक्यातील जुनोनी गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. दिंडीत पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना भरधाव कारने चिरडलं असून यामध्ये ७ वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तसंच ८ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पाच महिला, एक पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. वारकऱ्यांना धडक देणाऱ्या टाटा नेक्सॉन कारमधील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून कारमधील व्यक्ती या सांगोला तालुक्यातील सोनंद या गावातील रहिवासी आहेत.
दरम्यान, या अपघातात विठुरायाच्या दर्शनासाठी गेलेल्या वारकऱ्यांनी आपले प्राण गमावल्याने करवीर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.