मुंबई : सुरक्षित प्रवासासाठी मुंबईकरांवर आज मंगळवारपासून वाहतुकीच्या आणखी एका नियमाची सक्ती करण्यात येणार आहे. चारचाकी वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला आता सीटबेल्ट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, या नियमाचे पालन न करणाऱ्यांवर मंगळवारपासून दंडात्मक कारवाई न करता केवळ वाहतूक पोलिसांकडून कडक समज’ देण्यात येणार आहे. तर सीटबेल्ट सक्तीबाबत दंडात्मक कारवाई ११ नोव्हेंबरपासून सुरु करण्याचे आदेश वाहतूक पोलिस सहआयुक्त राजवर्धन यांनी दिले आहेत.

उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर देशभरातील अनेक राज्यांमध्ये वाहतुकीच्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून मोटार वाहन (सुधारित) कायदा २०१९ कलम १९४ (ब) (१) (सीट बेल्ट न लावणे) अंतर्गत मुंबईत चारचाकी मोटार वाहनातील वाहनचालक व इतर प्रवाशांनी प्रवास करताना सीटबेल्ट लावणे बंधनकारक करण्यात आले. कोणतीही घोषणा न करता थेट अंमलबजावणी केल्यास चालकांचा रोष सहन करावा लागण्याची शक्यता असल्याने मुंबई पोलिसांनी याबाबत १४ ऑक्टोबरलाच घोषणा केली. ज्या वाहनांमध्ये सीटबेल्ट नाहीत, अशा वाहनांना सीटबेल्ट बसविण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत ३१ ऑक्टोबरला संपत आहे. त्यामुळे आज, मंगळवारपासून पोलिस कडक समज देणार असून ११ नोव्हेंबरपासून दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

आरबीआयची स्वप्नपूर्ती, डिजिटल रुपया लाँच होणार, पहिल्या टप्प्यात ९ बँकांची निवड,यादी वाचा
जुन्या वाहनांना तूर्तास वगळले

सीटबेल्टच्या सक्तीमधून जुन्या वाहनांना तात्पुरते वगळण्यात आले आहे. ज्या टॅक्सी किंवा खासगी वाहनांमध्ये मागील सीटवर कंपनीमार्फत सीटबेल्टची व्यवस्था करण्यात आलेली नाही, अशा वाहनांवर ई चलानद्वारे दंडात्मक कारवाई करू नये, असेही या आदेशातून सांगण्यात आले आहे. त्यामुळे जुन्या टॅक्सीचालकांना दिलासा मिळाला आहे.

मित्राने दाखवले भलतेच स्वप्न, मैत्रिणीचा अश्लील व्हिडिओ वेबसाईटवर केला व्हायरल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here