मुंबई (दिपेश मोरे) : खाकी वर्दीतील पोलिस कठोर असतात, असा अनेकांचा समज असतो. परंतु खाकी गणवेशातही माणूसच असतो आणि त्यालाही मन असते हे एका घटनेतून दिसून आले. दादर येथील डेव्हिड ससून बालगृहात चार मुलांनी केलेल्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या १६ वर्षांच्या मुलाचे त्याच्या कुटुंबीयांना अंत्यदर्शन व्हावे, यासाठी पोलिसांनी दोन महिने शोधमोहीम राबवली. मात्र, त्यांच्या या शोध मोहिमेला अपयश आले. अखेर पोलिसांनी काल सोमवारी या मुलाला अखेरचा निरोप दिला

गिरगाव चौपटीवर दादासाहेब भडकमकर मार्ग पोलिसांना ६ ऑगस्टला गस्तीदरम्यान १६ वर्षांचा मुलगा एकटाच फिरत असल्याचे दिसले. पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याला नीट समजत नसल्याचे दिसून आले. आपुलकीने विचारपूस करताना निषाद असे नाव सांगणाऱ्या या मुलाने दिल्ली येथील न्यू स्टार चौकातील बस्तीपाडा येथे राहत असल्याचे सांगितले. पालकांचा शोध लागेपर्यंत बालकल्याण समितीच्या निर्देशानुसार निषादला दादरच्या डेव्हिड ससून बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते. मात्र, बालसुधारगृहातील विलगीकरण कक्षात १६ ऑगस्टला तो बेशुद्धावस्थेत आढळला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चार ते पाच मुलांनी त्याला मारहाण केल्याचे स्पष्ट दिसत होते. हत्येचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांना ताब्यात घेतले.

शिंदे-फडणवीस सरकार बरखास्त करा; काँग्रेसच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी
निषाद हा १६ वर्षांचा मुलगा होता. तो गतिमंद वाटत असला तरी सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच त्याची वर्तणूक होती. त्यामुळे त्याच्या पालकांचा शोध घेण्याची गरज पोलिसांना वाटली. त्यामुळे त्याचे पार्थिव सायन रुग्णालयातील शवगृहात ठेवले आणि पालकांचा शोध सुरु केला. दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी जाऊनही निषादच्या आईवडिलांचा पत्ता लागत नसल्याने अखेर सहायक आयुक्तांमार्फत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची परवानगी मिळविण्यात आली. सोमवारी पोलिस, समाजसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांनी सायन स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.

मुंबई ते दिल्ली शोधकार्य

निषाद याने दिल्लीच्या बस्तीपाडामधून आल्याचे सांगितले होते. पोलिसांनी त्याची माहिती फोटोसह इंटनरनेट तसेच समाजमाध्यमांवर, तसेच मुंबई, महाराष्ट्रासह दिल्लीतील पोलीस यंत्रणांना पाठविली. पोलिसांचे पथक दिल्ली येथे पोहोचले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने बस्तीपाडा परिसर पिंजून काढला. मात्र, काहीच हाती लागले नाही. बेपत्ता झालेल्या व्यक्तींच्या शोध घेणाऱ्या अनेक संकेतस्थळांवर त्याची माहिती अपलोड करण्यात आली. तांत्रिक पुरावे, खबरे नेटवर्क सर्व काही वापरुन झाले. इतके करूनही त्याच्या पालकांपर्यंत पोहोचता आले नाही.

Sushma Andhare : सुषमा अंधारे यांच्या सभेपूर्वीच तणाव; प्रबोधन यात्रेचे बॅनरच चोरले, पोलिसात तक्रार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here