नवी दिल्ली: इंधनाच्या चढ्या किमतींमुळे त्रस्त असलेल्या ग्राहकांना मोठा दिलासा देत OMC ने मंगळवार म्हणजेच १ नोव्हेंबरपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात करण्याची घोषणा केली आहे. नवीन दर १ नोव्हेंबर २०२२ पासून प्रभावी असतील. यानुसार १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात प्रति सिलेंडर ११५.५० रुपयांनी कपात करण्यात आली आहे. दरम्यान, घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या दरांमध्ये कोणताही बदल नसला तरी आंतरराष्ट्रीय किमती कमी करण्याचे फायदे OMC ने ग्राहकांना दिले आहेत.

बजेट पुन्हा बिघडलं; घरगुती गॅस वापराचा कोटा ठरला, आता वर्षभरात एवढेच सिलिंडर मिळणार
इंडियन ऑइलने मंगळवार, १ नोव्हेंबर रोजी एलपीजीचे नवीन दर जाहीर केले आहेत. त्यानुसार आजपासून १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत दिल्लीत ११५.५ रुपये, कोलकात्यात ११३ रुपये, मुंबईत ११५.५ रुपये आणि चेन्नईमध्ये ११६.५ रुपयांनी कमी झाली आहे. याशिवाय ६ जुलै २०२२ नंतर घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

पेट्रोल-डिझेल, LPG सिलिंडरच्या वाढत्या किमतींना ब्रेक लागणार, जाणून घ्या सरकारचे संपूर्ण प्लॅनिंग
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरांत घट
घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. पण १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (कमर्शियल एलपीजी) किमतीत सलग सातव्या महिन्यात कपात करण्यात आली आहे. १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात केल्याने हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिक आस्थापनांना ते कमी किमतीत उपलब्ध होणार आहे. मात्र, ६ जुलैपासून घरगुती सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ करण्यात आल्यापासून त्यात कोणताही बदल झालेला नाही. यापूर्वी, १९ मे २०२२ रोजी घरगुती सिलिंडरच्या किमतीत सुधारणा करण्यात आली होती.

गॅस एजन्सी डीलरशिप मिळवा आणि प्रत्येक सिलिंडरवर कमवा… जाणून घ्या कसा करणार अर्ज, किती होणार खर्च
दरम्यान, OMCs महिन्यातून दोनदा – एकदा महिन्याच्या सुरुवातीला आणि एकदा महिन्याच्या मध्यात- एलपीजी किंमत बदलण्याची घोषणा करते. यापूर्वी १ ऑक्टोबर रोजीही व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या होत्या. ओएमसीने गेल्या महिन्यात प्रति युनिट १९ किलो सिलिंडरची किंमत २५.५० रुपयांनी कमी केली होती. या नवीन सुधारणेसह १९ किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर राष्ट्रीय राजधानीत १,८८५ रुपयांवरून १,८५९ रुपयांना किरकोळ विकला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here