जयपूर: राजस्थान सरकारवर आलेल्या राजकीय संकटाच्या नाट्याचा दुसरा अंक सुरू झाला असून राजस्थान विधानसभेच्या अध्यक्षांनी काँग्रेसचे बंडखोर नेते यांच्या नोटीस पाठवल्याच्या विरोधात सचिन पायसट गटाने या नोटिशीला राजस्थान हायकोर्टात आव्हान दिले आहे. सचिन पायलट गटाने काँग्रेस विधिमंडळ पक्षाने बजावलेल्या व्हिपचे पालन केले नाही, असा ठपका ठेवत राजस्थान विधानसभा अध्यक्षांनी ही नोटीस बजावली आहे. मात्र ही नोटीस अवैध असल्याने ती लागू होत नाही असा सचिन पायलट गटाचा दावा आहे.

ही नोटीस अवैध आहे असे म्हणताना सचिन पायलट गटाने ही नोटीस विधानसभा सुरू असताना बजावलेली नसल्याचे म्हटले आहे. जेव्हा विधानसभा सुरू नसते तेव्हा अशी नोटीस विधानसभा अध्यक्ष बाहेरून देऊ शकत नाहीत, असे या गटाचे म्हणणे आहे. या कारणामुळे ही नोटीस कायद्याच्या कसोटीवर टिकणारी नाही, असे पायलट गटाचे म्हणणे आहे. या प्रकणावर राजस्थान हायकोर्टात आज ३ वाजता सुनावणी होत आहे. हायकोर्टाचे न्यायाधीश सतीशचंद्र शर्मा हे या प्रकरणावर सुनावणी करणार आहेत.

वाचा:

ही याचिका ऑनलाइन दाखल करण्यात आली आहे. माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी हे हायकोर्टात सचिन पायलट गटाती बाजू मांडणार आहेत.

एकाबाजूला सचिन पालयट यांना पक्षाचे दरवाजे उघडे आहेत असे बोलत असताना, दुसरीकडे पक्ष सचिन पायलट यांच्यावर सतत कारवाया करण्यात येत आहेत, याबाबतही सचिन पायलट गटाची नाराजी असल्याचे पायलट गटाचे आमदार बोलून दाखवत आहेत.

वाचा:

दुपारी ३ वाजता सुनावणी

नावाजलेले अनुभवी वकील मुकुल रोहतगी हे सचिन पायलट गटाची बाजू मांडत असल्याने या गटाची ही जमेची बाजू असल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांनी राज्यघटना वाचलेली दिसत नाही. अशा प्रकारे देण्यात आलेली नोटीस कायद्याच्या कसोटीवर टिकणारी नाही. हेच या नेत्यांना माहीत नाही,असा टोला पायलट गटाच्या आमदारांनी काँग्रेस नेत्यांना लगावला आहे. दरम्यान आज दुपारी ३ वाजता होणारी ही सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होत आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here