मुंबई : राज्यातील पर्यटनाच्या माध्यमातून एक लाख रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष धोरण अवलंबण्याचा निर्णय राज्य सरकारच्या पर्यटन विभागातर्फे घेण्यात आला आहे. त्याबरोबरच महिला पर्यटकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘आई’ या उपक्रमाची सुरुवात राज्य सरकारच्या वतीने करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. याबरोबरच राज्यातील डेक्कन ओडिसा ट्रेन आणि मुंबईतील रोरो बससेवा पुन्हा सुरु करण्यात येणार आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

महिला पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘आई’ ही संकल्पना एमटीडीसी आणि राज्याच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून प्रत्यक्षात आणली जात आहे. या अंतर्गत प्रत्येक महिन्याच्या काही विशेष दिवशी महिलांना सवलतदेखील दिली जाणार आहे. याशिवाय एमटीडीसीच्या मार्फत राज्यभरात काही हॉटेलांशी करार करण्यात येणार असून त्यांना ‘वुमन फ्रेंडली’चा दर्जा दिला जाणार आहे. ‘आई’ या योजनेसाठी एमटीडीसीकडून विशेष वेबसाइट तयार केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत कोणत्याही सहलीचे आयोजन करताना महिलांसाठी विशेष बसची सुविधा देताना त्यात जीपीएस सुविधाही उपलब्ध केली जाणार आहे. तसेच महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देताना ‘प्रथम ती’ अंतर्गत विशेष लक्ष दिले जाणार आहे, अशी माहिती लोढा यांनी दिली.

Rana Vs Kadu: रवी राणांनी तलवार म्यान केली, पण बच्चू कडू म्हणतात, ‘मै झुकेगा नही…’
महिलांसाठी महिलांकडून आणि महिलांनी या तत्त्वावर ही योजना राबवण्यात येणार आहे. यासाठी महिलांच्या दृष्टिकोनातून पर्यटनस्थळेदेखील निवडण्यात येणार आहेत. त्याशिवाय या सहलींचे आयोजन करताना उपलब्ध होणाऱ्या रोजगारांसाठी महिलांची निवड केली जाणार आहे. या महिला पर्यटनाच्या योजनेला प्रोत्साहन मिळावे, यासाठी वर्षातून एकदा ‘आई’ पर्यटन महोत्सवाचे आयोजन पर्यटन विभागाकडून करण्यात येणार आहे. यासाठी विविक्ष क्षेत्रांतील मान्यवर महिलांना आमंत्रित केले जाणार आहे. मनोरंजन क्षेत्रातील महिला कलाकारांनाही यात सहभागी करुन घेण्यात येणार असल्याचे कळते.

महिलांना सुरक्षित वातावरण निर्माण करून देण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना राबविली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून हॉटेल, रिसोर्ट, रेस्टॉरंट, ट्रान्सपोर्ट, मार्केटिंग, टुरिस्ट गाइड यांसारख्या अनेक क्षेत्रांत महिलांचा सहभाग वाढावा, यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याशिवाय महिलांनी एकत्र येऊन नव्या टुरिझम युनिटची स्थापना केल्यास त्यांना अनुदान देण्याचा विचार आहे, असंही मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं आहे.

या सहलींच्या माध्यमातून देणार प्राधान्य

मुंबई सहल – या योजनेच्या माध्यमातून महिलांसाठी मुंबई दर्शन आयोजित केले जाणार आहे.

धार्मिक सहल- मुंबईसह राज्यभरातून दरवर्षी अष्टविनायक दर्शनाला लाखोंच्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे ‘आई’ या योजनेअंतर्गत महिलांसाठी विशेष अष्टविनायक दर्शन आयोजित केले जाणार आहे.

हेरिटेज सहल – पुणे शनिवार वाडा, सिंहगड किल्ला, कसबा गणपती यांसारख्या अनेक ठिकाणी महिलांसाठी विशेष सहली आयोजित करण्यात येणार आहेत.

Mumbai News Today : मुंबईकरांनो आजपासून ‘या’ तारखेपर्यंत होणार पाणीकपात, जपून करा वापर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here