रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात सध्या आत्महत्या करणार्‍यांचे प्रमाण वाढले आहे. दररोज वेगवेगळ्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. प्रेम प्रकरण, दारूचे व्यसन, आर्थिक विषय, आजारपण अथवा नैराश्य अशा विविध कारणांमुळे या दुर्देवी घटना घडत आहेत. तालुक्यातील जयगड चरेवाडी येथील युवकाने गळफास घेत आत्महत्या केली. तर दुसरीकडे ३५ वर्षीय विवाहित युवकाने आंबेकरवाडी येथे दारूच्या नशेत गवत मारण्याचे औषध पिऊन आपले जीवन संपवले.

जयगड येथील युवकाच्या आत्महत्येमागेचं नेमकं कारण समजू शकलेल नाही पण प्रेम प्रकरणातून ही आत्महत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. जयगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चरेवाडी येथील राहुल एकनाथ जांभळे (२३) असे गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे.

Weather Forecast : लवकरच महाराष्ट्र गारठणार, पुण्यात सर्वात कमी तापमानाची नोंद
राहुलने रविवारी रात्री ९ ते १० च्या सुमारास घरीच लोखंडी बारला नायलॉनच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. यावेळी त्याची आई आणि भाऊ नंदिवडे इथे डॉक्टरकडे गेले होते. दोघे परत आल्यावर राहुलने गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनाला आले. त्यांनी याची माहिती तातडीने पोलिसांना दिली. जयगड पोलिसांनी घटनास्थळी पोहचत पंचनामा केला. याबाबतचा अधिक तपास जयगड पोलीस करत आहेत.

दारूच्या नशेत घेतले विषारी औषध…

रत्नागिरी आंबेकरवाडी येथे शेतीवाडी करून आपले कुटुंबाची उपजिवीका भागवत असलेल्या ३५ वर्षीय तरूण व्यक्तीने दारूच्या नशेत गवत मारण्याचे औषध घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दत्ताराम यर्शवत आंबेकर चय ३५,रा. आंबेकरवाडी तालुका रत्नागिरी या व्यक्तीचे नाव आहे. त्याला दारू पिण्याचे अति व्यसन होते. ३० ऑक्टोबर रोजी रोजी त्याची पत्नी व मुले त्यांचे शेतात भात कापण्यासाठी गेले होते याच वेळी असताना त्याने दारूच्या नशेत गवत मारण्याचे घरी आणून ठेवलेले ग्रामोन्न नामक विषारी औषध घेतले व यातच त्याचा धक्कादायक मृत्यू झाला. पत्नी घरी आल्यावर दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान त्यांना पती घरात अस्वस्थ दिसल्याने त्याला औषधोपचाराकरिता तात्काळ रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी येथे दाखल केले असता त्यांचेवर औषधोपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला आहे.

Mumbai News Today : मुंबईकरांनो आजपासून ‘या’ तारखेपर्यंत होणार पाणीकपात, जपून करा वापर…

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here