New Delhi Accident News: नवी दिल्लीतल्या करोल बाग परिसरात सोमवारी सकाळी एक दु:खद घटना घडली. फैज रोडवर चालत असलेल्या २७ वर्षीय तरुणीला बसनं चिरडलं. बस तरुणीला फरफटत घेऊन गेली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा मृत्यू झाला.

 

girl crushed by bus
नवी दिल्ली: नवी दिल्लीतल्या करोल बाग परिसरात सोमवारी सकाळी एक दु:खद घटना घडली. फैज रोडवर चालत असलेल्या २७ वर्षीय तरुणीला बसनं चिरडलं. बस तरुणीला फरफटत घेऊन गेली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

बस अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणीचं नाव सपना होतं. ती गाझियाबादच्या लोनी येथील रामेश्वर पार्क परिसरात राहत होती. तिचे वडील खाडी बाओली भागात फेरीवाले म्हणून काम करतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ९ च्या सुमारास अपघात झाला. सपना झंडेवाला एक्स्टेन्शन येथील ग्लोबेक्स लॉजिस्टिक्स कंपनीत कार्यरत होती. ती तिथे रिसेप्शनिस्ट म्हणून काम करायची. ऑफिसला जात असताना तिचा अपघात झाला. रस्ता ओलांडताना तिला बसनं चिरडलं.
प्रेयसीला भेटून घरी परतला, बेशुद्ध होऊन पडला; ११ दिवसानंतर मृ्त्यू, अखेर गूढ उकललं
अपघातासाठी कारणीभूत ठरलेली बस जप्त करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. बसच्या बोर्डवर दिल्ली-जयपूर-अजमेर लिहिलं होतं. ही बस याच मार्गावर धावायची. बसच्या मालकाचा शोध सुरू आहे. बसचा चालक आणि वाहकाला अटक करण्यासाठी पथक तयार करण्यात आलं आहे.
तुझ्या रक्षणाला मी समर्थ! बहिणीला दिलेला शब्द भावानं पाळला; घरापासून ५० मीटरवर जीव सोडला
चालकानं अचानक बस सुरू केल्यानं सपनाला आजूबाजूला जाण्याची संधीच मिळाली नाही. अवघ्या काही क्षणांत तिला बसनं चिरडलं. रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या सपनाला बसनं फरफटत नेलं. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here