Maharashtra Political crisis | पक्षांतरबंदी कायद्याचा विचार करता सुरुवातीला शिवसेना पक्षामधून १६ आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. त्यानंतर एक एक करत शिंदे गटाने ३७ चा आकडा गाठला. हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात निर्णायक ठरू शकतो. कायदेतज्ञ म्हणून माझं मत असं आहे की, जेव्हा ते १६ आमदार बाहेर पडले ती वेळ ठरवावी लागेल.

हायलाइट्स:
- महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते
- सुनावणी २९ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली
आजच्या सुनावणीपूर्वी ज्येष्ठ विधिज्ञ उल्हास बापट यांनी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले होते. आज सुनावणी पार पडली असती तर घटनापीठापुढे प्रामुख्याने शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा मांडला गेला असता. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवले असते तर शिंदे-फडणवीस सरकार कोसळून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली असती, असे भाकीत उल्हास बापट यांनी वर्तविले होते. मात्र, याप्रकरणाची सुनावणी २९ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील आगामी सुनावणी महाराष्ट्रातील संघर्षाचा निकाल निश्चित करणारी ठरू शकते.
उल्हास बापट यांनी आपले मत व्यक्त करताना एक थिअरी मांडली आहे. पक्षांतरबंदी कायद्याचा विचार करता सुरुवातीला शिवसेना पक्षामधून १६ आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. त्यानंतर एक एक करत शिंदे गटाने ३७ चा आकडा गाठला. हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात निर्णायक ठरू शकतो. कायदेतज्ञ म्हणून माझं मत असं आहे की, जेव्हा ते १६ आमदार बाहेर पडले ती वेळ ठरवावी लागेल. शिंदे गटाचे आमदार एकत्र बाहेर पडले की वेगवेगळे या मुद्द्याचा विचार करावा लागेल. सुनावणीअंती शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरले तर त्यांना मंत्रिपदी राहता येणार नाही. या १६ आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. मुख्यमंत्रीच अपात्र ठरले तर शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल. त्यामुळे सरकार चालवण्यासाठी ज्याच्याकडे बहुमत आहे, असा नवा मुख्यमंत्री शोधावा लागेल. महाराष्ट्रातील राजकीय पक्षांचे बलाबल पाहता, कोणत्याही पक्षाकडे बहुमत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर आगामी सहा महिन्यांत महाराष्ट्रात पुन्हा एकदा विधानसभेची मध्यावधी निवडणूक होईल, असे मत उल्हास बापट यांनी व्यक्त केले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.