औरंगाबाद : पुणे-औरंगाबाद हा नव्याने केला जाणारा एक्स्प्रेस-वे औरंगाबादजवळ समृद्धी महामार्गाला मिळवण्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केलेले ट्वीट गुगल अर्थच्या साह्याने केले आहे. दोन्हीही रस्ते एकमेकांशी जोडण्यासंदर्भात पुढील आठवड्यात बैठक होणार आहे, असे सांगून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सावध पवित्रा घेतला.

अखंड उड्डाणपूल आणि मेट्रो रेल्वे याबद्दलच्या वाहतुकीच्या सर्वसमावेशक कृती आराखड्याचे सादरीकरण सोमवारी ‘स्मार्ट सिटी’च्या कार्यालयात झाले. यावेळी आमदार हरिभाऊ बागडे यांनी पुणे-औरंगाबाद हा नव्याने तयार करण्यात येणारा एक्स्प्रेस-वे औरंगाबादेत समृद्धी महामार्गाला कुठे मिळणार आहे, असा सवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना केला. करमाडच्या परिसरात हे दोन्हीही रस्ते एकमेकांना मिळाले, तर त्याचा उपयोग त्या भागातील नागरिकांना होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अनिकेत कुलकर्णी यांनी अद्याप याबद्दल निश्चित काहीही ठरलेले नाही, असे सांगितले.

Akola : थरारक! शिवसेनेच्या अकोला उपशहरप्रमुखाच्या हत्येचा Video समोर, कारणही उघड!
मात्र, बागडे यांचे या उत्तरामुळे समाधान झाले नाही. नितीन गडकरी यांनी केलेले ट्वीट कशाच्या आधारे केले आहे, असा सवाल त्यांनी केला. ‘प्राधिकरणाचे सर्व ठरलेले आहे आणि फक्त आम्हाला माहिती द्यायची नाही असे दिसते’, असा आरोप बागडे यांनी केला. त्यावर अनिकेत कुलकर्णी म्हणाले, ‘त्यांचे ते ट्वीट गुगल अर्थच्या साह्याने केले आहे. दोन्हीही रस्ते कुठे आणि कसे मिळवायचे याबद्दल पुढील आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक आयोजित केली आहे. त्या बैठकीत नेमके काय ते ठरणार आहे.’

‘मेट्रो निओ’बद्दल सिडकोच्या मुख्य प्रशासक दीपा मुधोळ-मुंडे यांनी प्रश्न उपस्थित केला. मुंडे म्हणाल्या, ‘मेट्रो निओ ही ई-बस असेल तर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या बसमध्ये आणि त्या बसमध्ये काय फरक आहे? दोन्हीही उपक्रम सारखेच असतील, तर मेट्रो निओमध्ये वेगळेपण काय आहे, त्याचा खुलासा झाला पाहिजे.’ मात्र, मुंढे यांनी विचारणा केलेल्या बाबीवर शेवटपर्यंत खुलासा होऊ शकला नाही.
Bacchu Kadu : बच्चू कडूंच्या सभेची जय्यत तयारी, ८ हजार कार्यकर्त्यांसाठी १२ क्विंटलच्या पोळ्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here