मुंबई: मुंबईच्या मानखुर्दमध्ये शुक्रवारी संध्याकाळी १६ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. भावंडांसोबत लपाछपी खेळत असताना हा प्रकार घडला. रेश्मा खरावी असं मृत मुलीचं नाव आहे. लिफ्टच्या दरवाज्याला असलेल्या चौकटीत रेश्माचं डोकं अडकलं. दुर्दैवानं त्याचवेळी वरुन लिफ्ट आली. लिफ्ट रेश्माच्या डोक्याला धडकली. त्यात ती जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला.

रेश्मा खरावीच्या कुटुंबियांनी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना अपघातासाठी जबाबदार धरलं आहे. लिफ्टच्या दरवाज्याला असलेली चौकट बऱ्याच दिवसांपासून उघडी होती. ती बंद करण्याची विनंती अनेकदा करुनही काहीच केलं गेलं नाही. त्यामुळेच या अपघात झाल्याचा आरोप रेश्माच्या नातेवाईकांनी केला.

रेश्मा खरावी शेजारच्या साठे नगरमध्ये वास्तव्यास होती. तिच्या दोन लहान भावांसोबत ती आजीकडे आली होती. रेश्माच्या आजी सविता वाघेरी पतीसह लल्लूभाई कंपाऊंडमधील न्यू साई धाम सोसायटीत वास्तव्यास आहेत. रेश्मा दिवाळीसाठी आजीकडे आली होती. रेश्माचं कुटुंब गुजरातला जाण्यासाठी निघणार होतं. मात्र त्यापूर्वीच ही दुर्दैवी घटना घडली.
ऑफिसला चाललेल्या तरुणीला बसनं चिरडलं, फरफटत नेलं; काही क्षणांत सगळंच संपलं
लपाछपी खेळत असताना रेश्मावर राज्य आलं. ती आकडे मोजण्यासाठी लिफ्टच्या दारावर गेली. त्यावेळी तिचा भाऊ विशाल लपायला गेला. थोड्याच वेळात विशालनं रेश्माची किंकाळी ऐकली. रेश्माचा आवाज ऐकून विशाल धावला. रेश्माचं डोकं लिफ्टच्या दारावर असलेल्या चौकटीत अडकल्याचं त्यानं पाहिलं. विशाल लगेच घराकडे धावला.

लिफ्टच्या दारावर असलेल्या चौकटीत अडकलेलं रेश्माचं डोकं बाहेर काढण्यासाठी कुटंबातील सदस्यांना जवळपास १५ मिनिटं लागली. जखमी अवस्थेत असलेल्या रेश्माला शताब्दी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र अर्ध्या तासात तिनं प्राण सोडला. डोक्याला आणि मानेला झालेल्या दुखापतीमुळे रेश्माचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदनातून समोर आलं.
तुझ्या रक्षणाला मी समर्थ! बहिणीला दिलेला शब्द भावानं पाळला; घरापासून ५० मीटरवर जीव सोडला
विशेष म्हणजे न्यू साई धाम इमारतीची लिफ्ट गेल्या वर्षभरापासून बंद होती. अवघ्या पाच दिवसांपूर्वीच ती सुरू झाली. रेश्माच्या आजीनं अनेकदा सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना लिफ्टच्या दाराची चौकट बंद करण्यास सांगितलं होतं. मात्र पदाधिकाऱ्यांनी वेळीच चौकट बंद केली नाही. अन्यथा दुर्दैवी घटना टळली असती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here