पुणे : राज्याचे कृषी मंत्री आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर ते सातत्याने आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना आव्हान देत आहेत. आदित्य ठाकरे यांनी वरळी मधून राजीनामा द्यावा. मी सिल्लोड मधून देतो, मग समोरासमोर लढाई होऊनच जाऊ द्या, असे आव्हान अब्दुल सत्तार यांनी दिले आहे. मी आठ दिवसांत राजीनामा द्यायलाही तयार आहे, असे सत्तार यांनी सांगितले. ते मंगळवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी अब्दुल सत्तार यांनी शिंदे गटाला सातत्याने डिवचणाऱ्या आणि अंगावर घेणाऱ्या आदित्य ठाकरे यांना ओपन चॅलेंज दिले. मी म्हटलं होतं की तुम्ही वरळीतून राजीनामा द्या आणि मी सिल्लोडमधून राजीनामा देतो. मग त्यांच्या एका नेत्याने वक्तव्य केलं तुम्हाला दोन वर्षानंतर कळेल की निवडणूक काय असते. मी म्हणलं दोन वर्ष कशाला वाट बघायची आता टेस्ट मॅच होऊन जाऊ द्या आणि मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. आता ही माझं चॅलेंज आहे की, त्यांनी नाही दिला तरी मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली की आठवडाभराच्या आत राजीनामा देईल, असे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटले.

केंद्रीय कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर तसेच महाराष्ट्राचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार व फलोत्पादन मंत्री संदीपान भूमरे यांच्या उपस्थितीत वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था, पुणे येथे ‘हॉर्टिकल्चर व्हॅल्यू चेन फंक्शन’ या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.याच उद्घाटन तोमर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रदर्शनाची पाहणी करताना सत्तार बोलत होते.
शिंदे माझ्यासमोर चर्चेला या, देवेंद्रजी तुम्ही ‘त्या’ माणसाचं मला नाव सांगा, आदित्य ठाकरेंचं दोघांना ओपन चॅलेंज
यावेळी अब्दुल सत्तार यांनी अतिवृष्टीमुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना राज्य सरकार दुप्पट नुकसान भरपाई देईल, असे मला वाटते. महाराष्ट्र असे राज्य आहे जिथे जुलै आणि ऑगस्टमध्ये नुकसान झाल्यास सप्टेंबरमध्ये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळते. ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे तो सरकारच्या मदतीपासून वंचित राहणार नाही. याबाबत मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली आहे. मी स्वतः अनेक जिल्ह्यांमध्ये जाऊन नुकसाग्रस्तांना भेट दिली. अवकळी पावसामुळे शेतकरी निराश झाला होता त्यांना आधार देण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले आहे, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले.

एकनाथ शिंदे हे सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहेत. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांची जाणीव आहे. शेतकऱ्यांना साडेचार हजार कोटी पेक्षा जास्त मदत आतापर्यंत केली आहे. आता झालेल्या नुकसानीचे पंचनामे आले की शेतकऱ्यांना मदत मिळेल. नुकसान झालेला एक ही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. विरोधी पक्षाला काय बोलायचं काय नाही बोल्याचं तो त्यांचा अधिकार आहे, असे सत्तार म्हणाले.
‘फडणवीस महाराष्ट्राशी खोटं बोलले’; आदित्य ठाकरेंनी थेट पुरावे सादर करत सर्वच दावे खोडून काढले!

उद्धव ठाकरेंनी २४ मिनिटांत काय पाहिलं माहिती नाही: अब्दुल सत्तार

तर उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यावर देखील अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंचा औरंगाबादचा अडीच तासाचा दौरा होता. त्यामध्ये २४ मिनिटे शेतकऱ्यांच्या बांधावर आले. त्यांना २४ मिनटात काय दिसलं मला काही कल्पना नाही. पण आम्ही २४ दिवसापासून शेतकऱ्यांसोबत होतो. राजकारणासाठी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन फोटो काढणं म्हणजे वेगळी गोष्ट आहे, ते स्वतः जेव्हा शेतकरी होते तेव्हा त्यांनी २०१९ मध्ये अनेक घोषणा केल्या. पण त्याची त्यांना आठवण राहिली नाही, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . याकरता राज्य सरकार एस डी आर एफ च्या निधीतून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून त्यांना दिलासा देत आहे. प्रसंगी हा निधी जर कमी पडल्यास केंद्र सरकार राज्य सरकारला आर्थिक मदत करेल, असं केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितलं. हॉर्टिकल्चर मध्ये नवनवीन प्रयोग करण्याकरता कृषी विभाग शेतकऱ्यांना नेहमीच प्रोत्साहित करेल. या देशातील कृषी क्षेत्र वाढविण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार नेहमीच प्रयत्नशील असेल, असेही तोमर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here