अमरावती : राज्याच्या सत्तासंघर्षानंतर आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील वाद शिगेला पोचला आहे. बच्चू कडू आज सभा घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. तत्पूर्वी १२ वाजून ४५ मिनिटांनी बच्चू कडू यांनी राज्यभरातील जिल्हा प्रमुखांसोबत पुढील निर्णय घेण्यासाठी ( Bacchu Kadu Meeting ) बैठक सुरू केली आहे. मात्र बातमी लिहीपर्यंत (१ वाजून १० मि.) प्रहार पक्षाचे एकमेव आमदार (मेळघाट) राजकुमार पटेल पोहचले नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद पेटला असताना बच्चू कडू आज काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाच्या आजच्या या सभेला हजेरी लावण्यासाठी राज्यभरातील अनाथ, दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने अमरावतीमध्ये दाखल झाले आहेत. मात्र प्रहार पक्षाचे मेळघाटातील एकमेव आमदार असलेले राजकुमार पटेल हे ( Melghat Mla Rajkumar Patel ) बैठकीला उपस्थित नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Bacchu Kadu : बच्चू कडूंच्या सभेची जय्यत तयारी, ८ हजार कार्यकर्त्यांसाठी १२ क्विंटलच्या

माजी राज्यमंत्री आणि विद्यमान आमदार बच्चू कडू गेल्या आठवडाभरापासून सतत प्रहार कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहेत. सातत्याने बैठका सुरू आहेत. सोमवारी रात्री कुर्ड पूर्णा येथे प्रहार पक्षाची महत्त्वाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीलाही आमदार राजकुमार पटेल अनुपस्थित होते. त्यापूर्वी नागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेतही आमदार राजकुमार पटेल उपस्थित नव्हते. दरम्यान आजच्या या अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या बैठकीला सुद्धा आमदार राजकुमार पटेल अनुपस्थिती असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

melghat mla rajkumar patel

मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल

बच्चू कडूंच्या सभेची तयारी जोरात; ८ हजार कार्यकर्त्यांसाठी १२ क्विंटल पोळ्या, ३ क्विंटल भात तयार

याबाबत राजकुमार पटेल यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र त्यांचा मुलगा रोहित पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही प्रहार पक्षासोबत आहोत. आमदार राजकुमार पटेल हे काही वेळात अमरावतीत पोहोचणार असून आम्ही प्रहार पक्षसोबत आहोत, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, आमदार राजकुमार पटेल हे बैठक संपल्यानंतर दाखल झाले.

राणा दाम्पत्याच्या घरासमोर बंदोबस्त वाढवला, गोपनीय माहिती मिळताच पोलीस अलर्टवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here