नवी दिल्ली: पश्चिम दिल्लीतील हरी नगरात तिहेरी हत्याकांड घडलं आहे. हरी नगरच्या ब्लॉक ५० मध्ये एका घरात एका पुरुषाचा आणि दोन महिलांचे मृतदेह आढळून आले. मृतांमध्ये समीर आहुजा, त्यांची पत्नी शालू आणि मोलकरणी सपना यांचा समावेश आहे. हत्येमागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

पश्चिम दिल्लीतील हरी नगरातील घरात पती, पत्नी आणि त्यांच्या मोलकरणीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्याचं काम सुरू आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे.
तुझ्या रक्षणाला मी समर्थ! बहिणीला दिलेला शब्द भावानं पाळला; घरापासून ५० मीटरवर जीव सोडला
आज सकाळी साडे सातच्या सुमारास सपना नेहमीप्रमाणे घरकामासाठी आहुजांच्या घरी पोहोचली. यानंतर मारेमारी घरात पोहोचल्याचं सांगण्यात येत आहे. पाच मारेमारी होते आणि ते दुचाकी घेऊन आले होते, अशी माहिती सुत्रांनी दिली. जोडप्याची २ वर्षांची मुलगी घरात सुखरुप स्थितीत सापडली. पोलिसांनी या घटनेबद्दल अधिक बोलण्यास नकार दिला. मात्र लुटमारीच्या हेतूनं ही घटना घडली असावी असा अंदाज आहे.
प्रेयसीला भेटून घरी परतला, बेशुद्ध होऊन पडला; ११ दिवसानंतर मृ्त्यू, अखेर गूढ उकललं
घटनेची माहिती जोडप्याच्या कुटुंबियांना, नातेवाईकांना देण्यात आली आहे. घरात चोरी झाली का याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. प्रकरणाच्या तपासासाठी स्थानिक पोलिसांसह विशेष पथकं कामाला लागले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झालेलं फुटेज गोळा केलं जात आहे. त्यातून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here