कार्यक्रमात नेमकं काय घडलं?
बेडग इथल्या एका मंडळाच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्राक उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या आणि बेडग गावाचे नाव देशात गाजवणाऱ्या मानकऱ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्याच आलं होतं. त्यानंतर सोशल मिडिया स्टार गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. नृत्याचा कार्यक्रम सुरु झाला. तिचं नृत्य पाहण्यासाठी जिल्ह्यातून आणि बाहेरुन तिचे चाहते आले होते. कार्यक्रामाच्या वेळी शाळेच्या पटांगणात तुफान गर्दी झाल्याने काही प्रेक्षक हे शाळेच्या कौलारु छतावर जाऊन नृत्याचा ताल धरु लागल्याने कौलांचा चुराडा झाला. तार जाळीच्या कम्पाऊंडचेही मोठं नुकसान झालं. त्याचबरोबर ज्या झाडावर प्रेक्षक बसले होते तेही झाड मुळासह कोसळलं.
In Instagram Star Gautami Patli Lavani Program the Roof of ZP School Crumbled; इन्स्टास्टार गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमात प्रेक्षकांचा धुमाकूळ, जिल्हा परिषद शाळेच्या छताचा चुराडा
सांगली : इन्स्टास्टार गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमात प्रेक्षकांनी हैदोस घातल्याचा प्रकार उघडकीस आला. सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडग येथे ही घटना घडली. गौतमी पाटीलचं नृत्य पाहण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी झाली. त्यातच काही प्रेक्षक जिल्हा परिषद शाळेच्या कौलारु छतावर जाऊन ठेका धरु लागले. यामुळे जिल्हा परिषद शाळेच्या छताचा चुराडा तर झाडावर प्रेक्षक बसल्याने अनेक झाडे देखील मोडली.