परभणी : परभणी जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सोयाबीन, कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे. मात्र, परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील वाघलगाव येथील तरुण शेतकरी मारोती घनवटे यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत शेतामध्ये वांग्याची लागवड करून अवघ्या १२० दिवसांमध्ये दोन लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. त्यामुळे राज्यातील इतर शेतकऱ्यांनी देखील मारोती घनवटे आदर्श घेऊन पारंपरिक शेतीला फाटा देत कमी वेळामध्ये जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकांची लागवड करणे गरजेचे बबनले आहे.

गंगाखेड तालुक्यातील वाघलगाव येथील मारुती घनवटे या तरुण शेतकऱ्याने पारंपारिक शेतीला फाटा देऊन काहीतरी शेतामध्ये नवीन प्रयोग करायचा आहे. अशी जिद्द उराशी बाळगली आणि बाजारपेठेतून वांग्याचे बियाणे विकत घेतले. बियाण्याची लागवड करून वांग्याची रोप घरीच तयार केली आणि आपल्या ३० गुंठे शेतीमध्ये ४ हजार वांग्याच्या रोपाची लागवड केली. सदरील रोपाचा तळ हत्याच्या फोडाप्रमाणे संभाळ केला. यासाठी मारोती घनवटे यांना वडील रामराव विठ्ठलराव धनवटे, आई गिरजाबई रामराव धनवटे, भाऊ रमेश रामराव घनवटे, भावाची पत्नी द्वारकाबाई रमेश घनवटे आणि पत्नी वैष्णवी मारोती धनवटे यांची मोलाची साथ मिळाली.

Mumbai News: मुंबईकरांनो आजपासून ‘या’ तारखेपर्यंत होणार पाणीकपात, जपून करा वापर…
अखेर वांग्यांच्या झाडाला वांगी लागण्यास सुरुवात झाल्यानंतर धनवटे कुटुंबाने घरच्या घरी सकाळी लवकर उठून वांगी तोडून ते विक्रीसाठी गंगाखेड इथे घेऊन यायचे असा दिनक्रम सुरू झाला. वांग्याच्या उत्पादनामध्ये घट होऊ नये यासाठी मारुती घनवटे यांनी वांग्यांच्या झाडाची चांगली निगा राखली. त्यामुळे त्यांना ३० गुंठ्यामध्ये लावलेल्या वांग्यांमधून अवघ्या १२० दिवसांमध्ये २ लाख ५० हजार रुपयाचे उत्पन्न मिळाले आहे. १२० दिवसांमध्ये मारोती घनवटे यांनी वांग्याची निगा राखण्यासाठी ५० हजार रुपयांचा खर्च केला आहे. यामुळे त्यांना २ लाख रुपये निव्वळ नफा मिळाला आहे.

Weather Forecast: लवकरच महाराष्ट्र गारठणार, पुण्यात सर्वात कमी तापमानाची नोंद
परभणी जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची पिके हातातून गेली असताना पारंपरिक शेतीला फाटा देत मारुती घनवटे यांनी वांग्याची लागवड करून कमी वेळामध्ये लाखो रुपयाचा नफा मिळवला आहे. त्यामुळे राज्यातील इतर शेतकऱ्यांनी देखील मारोती घनवटे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पारंपारिक शेतीला फाटा देत इतर पिकांची लागवड करून आपली आर्थिक प्रगती साधने काळाची गरज बनली आहे.

स्वतःच करतात वांग्याची विक्री…

मारोती घनवटे यांनी शेतामध्ये लावलेल्या वांग्याच्या झाडाला आलेली वांगी धनवटे कुटुंब स्वतः सकाळी पहाटे उठून तोडून ते बाजारामध्ये मारोती घनवते हे दुचाकीवरून विक्रीसाठी आणतात सदरील वांगी व्यापाऱ्यांना न विकता मारोती घनवटे हे बाजारामध्ये बसून वांग्याची विक्री करतात. त्यांच्या वांग्याला जवळपास शंभर रुपये किलोपर्यंत भाव मिळाला असल्याचे ते सांगतात. त्यामुळे त्यांना वांगी विक्रीतून अधिकचा नफा मिळाला आहे. असे असले तरी शेतातील वांग्यांच्या झाडाची निघा राखण्यासाठी घनवटे कुटुंब दिवस-रात्र एक करत आहे.

धक्कादायक! एकाच दिवशी जिल्ह्यात २ आत्महत्या, दोघांचीही कारण समोर येताच पोलीस हादरले…
अनेक कंपन्यांनी केलं सन्मानित…

तरुण शेतकरी मारोती धनवटे यांनी भीडो पद्धतीने पेरूची लागवड या विषयावर प्रशिक्षण घेतले असल्याने त्यांना कृषी विज्ञान केंद्र पायरन्स अहमदनगर यांनी प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहे. तर पाणी फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जलसंधारण आणि मनसंधारण या प्रशिक्षणामध्ये मारोती घनवटे यांनी सहभाग नोंदवल्यामुळे अभिनेते आमिर खान यांनी त्यांना पाणी फाउंडेशनच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहे. या सोबतच कृषी विभागाच्या अनेक अधिकाऱ्यांनी त्यांच्या शेतीला भेट देऊन पाहणी केली आहे.

‘मी तुझ्या पत्नीला प्रेग्नंट केलं’, लग्नानंतर पहिल्यांदाच पत्नीला माहेरी सोडायला आला अन्…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here