सोनीपत: प्रेमसंबंध, एकतर्फी प्रेमातून तरुणींवर, महिलांवर, तरुणींवर ऍसिड हल्ल्याच्या घटना घडतात. अनेकदा अशा घटना वाचनात, ऐकण्यात येतात. मात्र हरयाणाच्या सोनीपतमध्ये याच्या अगदी उलट घटना घडली आहे. तरुणानं लग्नास नकार दिल्यानं त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या तरुणीनं त्याच्यावर ऍसिड फेकलं. तू माझा नाही झालास, तर मी तुला कोणाचाच होऊ देणार नाही म्हणत तरुणीनं तरुणावर ऍसिड टाकलं.

ऍसिड हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचं नाव श्याम सिंह आहे. श्याम सिंह झज्जर जिल्ह्याच्या बहादूरगढचा रहिवासी आहे. तो अनाथ आहे. सोनीपूतच्या मयूर विहारमध्ये श्याम सिंह त्याच्या आत्यासोबत राहतो. श्याम एका कंपनीत काम असल्याचं त्याची आत्या अनिता यांनी सांगितलं. काही दिवसांपूर्वी श्यामची मैत्री गोहाना गावात वास्तव्यास असलेल्या एका अंजली नावाच्या तरुणीशी झाली. अंजलीनं श्यामचा नंबर मिळवला आणि रोज त्याच्याशी संवाद साधू लागली.
प्रेयसीला भेटून घरी परतला, बेशुद्ध होऊन पडला; ११ दिवसानंतर मृ्त्यू, अखेर गूढ उकललं
काही दिवसांतच अंजलीनं तिच्या आईला घेऊन श्यामच्या आत्येच्या घरी पोहोचली. अंजलीकडून श्यामला लग्नासाठी मागणी घालण्यात आली. श्यामनं थोडा वेळ मागितला. अंजली विवाहित असून ती पतीपासून वेगळी राहत असल्याचं श्यामला समजलं. त्यामुळे त्यानं लग्नास नकार दिला. नकार ऐकून अंजली संतापली. श्यामला वारंवार फोन करून त्रास देऊ लागली. तू माझा झाला नाहीस, तर मी तुला कोणाचाच होऊ देणार नाही, असं तिनं श्यामला सुनावलं.
तुझ्या रक्षणाला मी समर्थ! बहिणीला दिलेला शब्द भावानं पाळला; घरापासून ५० मीटरवर जीव सोडला
श्यामच्या आत्येनं त्याला अंजलीचा नंबर ब्लॉक करण्यास सांगितलं. श्यामनं नंबर ब्लॉक केल्यावर अंजली आणखी संतापली. २६ ऑक्टोबरला श्याम दूध आणण्यासाठी बाहेर गेला होता. तिथे अंजली ऍसिडची ५ लिटरची बाटली घेऊन पोहोचली. श्यामला काही कळण्याआधी अंजलीनं त्याच्यावर संपूर्ण बाटली रिकामी केली. श्यामचे हात, पाय, तोंड, कंबर गंभीररित्या भाजले. श्यामच्या नातेवाईकांना याबद्दल समजताच ते घटनास्थळी धावले. त्यांनी श्यामला रुग्णालयात दाखल केलं.

श्यामची अवस्था गंभीर आहे. त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी श्यामच्या आत्यानं पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. पोलीस कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप आत्येनं केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here