मी गेल्या महिन्यात टार्गेट पूर्ण करण्यात अपयशी ठरलो. त्यामुळे ९ ऑक्टोबरला मी राजीनामा दिला. मात्र अमित सिंह यांनी राजीनामा स्वीकारला नाही, असं आनंद यांनी सांगितलं. शनिवारी सकाळी ९.३० वाजता अमित यांनी मला फोन केला आणि मला माझ्या कामाचा तपशील जमा करायला सांगितला. मला टार्गेट पूर्ण करता आलेलं नाही आणि संध्याकाळपर्यंत मी सगळ्या नोंदी जमा करतो असं मी त्यांना कळवलं. मी त्यांचा एक कॉल घेऊ शकलो नाही. त्यामुळे ते फोनवर मला शिव्या देऊ लागले. त्यांनी संध्याकाळी मला ऑफिसमध्ये बोलावलं, अशा शब्दांत आनंद यांनी घटनाक्रम सांगितला.
त्यादिवशी मी बॉसला भेटलो. मी त्यांच्याकडे इन्सेंटिव्हची मागणी केली. मात्र त्यांनी इन्सेंटिव्ह देण्यास नकार दिला. आम्ही मीटिंग रुममध्ये होतो. त्यावेळी अमित यांचं स्वत:वरील नियंत्रण सुटलं. त्यांनी तिथे टेबलवर असलेलं एक घड्याळ उचलून माझ्या डोक्यात मारलं. ते घड्याळ प्लास्टिक क्रिस्टलचं होतं. माझ्या डोक्यातून रक्तस्राव सुरू झाला. माझ्या सहकाऱ्यांनी मला शताब्दी रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी माझ्या डोक्यातून प्लास्टिकचे तुकडे काढले आणि जखमेवर टाके घातले, असं आनंद यांनी सांगितलं. या प्रकरणी पोलिसांनी अमित सिंह यांच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून त्यांना नोटीस पाठवली आहे.
Home Maharashtra boss hits employee, टार्गेट पूर्ण न झाल्यानं बॉस संतापला; मीटिंगमध्ये कर्मचाऱ्याचं डोकं...
boss hits employee, टार्गेट पूर्ण न झाल्यानं बॉस संतापला; मीटिंगमध्ये कर्मचाऱ्याचं डोकं फोडलं; मुंबईतील घटना – boss hits junior with clock for failing to meet monthly sales target in mumbai
मुंबई: मुंबईच्या पश्चिम उपनगरातील एका कर्मचाऱ्यानं बॉसवर गंभीर आरोप केला आहे. आरोग्य विमा योजनेचं मासिक लक्ष्य पूर्ण न झाल्यानं बॉसनं डोकं फोडल्याचा दावा ३० वर्षांच्या आनंद हवलदार सिंह यांनी केला. बॉसनं टेबलावरील घड्याळ डोक्यात मारल्यानं टाके पडल्याचं आनंद यांनी पोलिसांना सांगितलं. या प्रकरणी पोलिसांनी आनंदचे मॅनेजर असलेल्या अमित सुरेंद्र सिंह (३५) यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे.