दिल्ली: पश्चिम दिल्लीच्या हरी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या तिहेरी हत्याकांडाचं गूढ उकललं आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. प्रकरणातील मुख्य आरोपी तरुण आणि त्याची प्रेयसी फरार आहे. त्यांच्या अटकेसाठी छापेमारी सुरू आहे. पोलीस आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. घटना अशोक नगर परिसरात घडली आहे. येथील एका घरात पती, पत्नी आणि मोलकरणीचा मृतदेह आढळून आला. चाकू भोसकून तिघांची हत्या करण्यात आली.

समीर आहुजा आणि त्यांची पत्नी शालू यांची मारेकऱ्यांनी हत्या केली. तितक्यात मोलकरीण सपना तिथे पोहोचली. मारेकऱ्यांनी तिचीही हत्या केली. नोकरीवरून काढल्याचा बदला घेण्यासाठी हत्या करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृत शालू ब्युटी पार्लर चालवायची. १० दिवसांपूर्वी तिनं हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि त्याच्या मैत्रिणीला नोकरीवरून काढलं. शालूनं दोघांसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. याचा बदला घेण्यासाठी दोघांनी त्यांच्या मित्रांसह कट रचला. या प्रकरणात पोलिसांनी सचिन (१९) आणि सुजित (२१) यांना अटक केली आहे. मुख्य आरोपीसह अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
माझा झाला नाहीस, तर कोणाचाच होऊ देणार नाही! नकार देताच तरुणीनं तरुणावर फेकलं ५ लिटर ऍसिड
चार मजली घराच्या तळमजल्यावर शालू आणि सपना यांचा मृतदेह आढळून आला. तर अप्पर ग्राऊंडवर समीर आहुजा यांचा मृतदेह सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मारेकऱ्यांची संख्या ४ ते ५ इतकी आहे. त्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी आयफोन १३, हत्येसाठी वापरण्यात आलेलं हत्यार, रक्तानं माखलेला टॉवेल सापडला आहे. हत्येनंतर घरातून लॅपटॉप, रोकड आणि अन्य वस्तू चोरल्याची माहिती आरोपींनी चौकशीत दिली.
टार्गेट पूर्ण न झाल्यानं बॉस संतापला; मीटिंगमध्ये कर्मचाऱ्याचं डोकं फोडलं; मुंबईतील घटना
सकाळी सव्वा नऊच्या सुमारास तिहेरी हत्येची माहिती मिळाल्याचं डीसीपी घनश्याम बन्सल यांनी सांगितलं. पहिल्या कॉलमध्ये चोरी झाल्याचं सांगण्यात आलं. घटनास्थळी पोहोचल्यावर तीन मृतदेह आढळून आले. त्यातील दोन महिलांचे आणि एक पुरुषाचा होता. आहुजा कुटुंब प्रॉपर्टी व्यवसायात होतं. वर्षभरापूर्वीच ते विकासपुरीतून अशोक नगरला राहायला आलं होतं. त्यामुळे त्यांच्या परिसरातील फार जणांशी ओळख नव्हती, अशी माहिती बन्सल यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here