यवतमाळ : यवतमाळ येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. पीयूष बरलोटा यांच्या कारला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात डॉ. पियूष यांच्या पत्नी आणि स्त्री रोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. सुरेखा बरलोटा यांचा जागीच मृत्यू झाला. तसंच अन्य तीन जण जखमी झाले आहेत. ही घटना आज दुपारी निर्मल ते हैदराबाद मार्गावर घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. बरलोटा व त्यांच्या मित्राचे कुटुंब हैदराबाद येथून आलिशान कारने यवतमाळला परतत होते. यावेळी वाटेत निर्मलपासून काही अंतरावर टोल नाक्याजवळ त्यांच्या कारचा (एमएच २९, बीपी ४२००) टायर अचानक फुटल्याने अपघात झााला. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरश: चक्काचूर झाला.

अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. पूजा पीयूष बरलोटा (१६), अतिथी (१८) आणि मिनल (४०) यांच्यावर निर्मल येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर काहीजण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. अपघात होताच डॉ. पीयूष बरलोटा यांनी फोडलेला टाहो हृदय पिळवटून टाकणारा होता.

मोदी सरकारने महाराष्ट्रातील तो प्रकल्प द्वारकेला नेला; पृथ्वीराज चव्हाण यांनी केले उघड

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच हैदराबाद येथील डॉक्टर्स असोसिएशनचे पदाधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले. निर्मल येथील शासकीय रुग्णालयात डॉ. सुरेखा बरलोटा यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत पार्थिव यवतमाळात पोहोचण्यासाठी शक्यता आहे. या घटनेने यवतमाळच्या वैद्यकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here