लातूर: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यानंतर आता माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांना करोनाची लागण झाली आहे. सध्या ते लातूरमध्येच उपचार घेत आहेत. मात्र, त्यांना पुढील उपचारांसाठी पुण्याला हलवण्याचा विचार सुरू असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं. (Former Maharashtra CM Shivajirao Patil-Nilangekar tests Covid-19 positive)

वाचा:

गेल्या काही दिवसांपासून निलंगेकरांना प्रकृतीचा त्रास जाणवत होता. १४ तारखेला शिवाजीरावांना ताप आणि सर्दीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर निलंग्यातील डॉक्टरांशी चर्चा करून त्यांना लातूरला हलवण्यात आलं. तिथं त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. मात्र, तिथं त्यांची करोना चाचणी करून घेण्यात आली होती. त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांची प्रकृती अगदी स्थिर आहे. त्यांचा स्वभाव लढवय्या आहे. ते या आजारावर मात करून ठणठणीत बरे होतील,’ असा विश्वास माजी मंत्री व निलंगेकरांचे नातू संभाजी पाटील-निलंगेकर यांनी व्यक्त केला आहे.

वाचा:

शिवाजीराव पाटील हे लोकांमध्ये वावरणारे नेते आहेत. अनेक कार्यकर्त्यांच्या त्यांच्याकडं राबता असतो. मात्र, करोनाच्या काळात ते घरातच होते. वयोमानामुळं कुटुंबीयांकडून त्यांची काळजीही घेतली जात होती. तरीही त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.

वाचा:

गेल्या काही दिवसांत राज्यातील अनेक नेते व मंत्र्यांना करोनाची लागण झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात लोकांना मदत करताना संपर्कात आल्यामुळं त्यांना बाधा झाली होती. सुरुवातीला राज्याचे गृहनिर्माण जितेंद्र आव्हाड यांना करोनाची लागण झाली होती. बऱ्याच दिवसांच्या उपचारानंतर ते ठणठणीत बरे झाले. त्यानंतर माजी मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे करोना पॉझिटिव्ह आले होते. नांदेडहून मुंबईला येऊन त्यांनी उपचार घेतले होते. त्यानंतर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनाही करोनामुळं रुग्णालयात दाखल व्हावं लागलं होतं. या तिघांनीही करोनावर मात केली आहे. तर, भाजपचे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचं करोनामुळं निधन झालं आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here